राज्यात आजपासून ‘कलांगण’ उपक्रम
By admin | Published: May 1, 2015 01:04 AM2015-05-01T01:04:03+5:302015-05-01T01:04:03+5:30
राज्यातील विविध जिल्ह्यांत देशभक्ती, प्रगती व संस्कृतीचा अनोखा संगम असलेला प्रबोधनात्मक ‘कलांगण’ हा सांस्कृतिक उपक्रम महाराष्ट्र दिनानिमित्ताने शनिवारी सुरू होत आहे.
पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांत देशभक्ती, प्रगती व संस्कृतीचा अनोखा संगम असलेला प्रबोधनात्मक ‘कलांगण’ हा सांस्कृतिक उपक्रम महाराष्ट्र दिनानिमित्ताने शनिवारी सुरू होत आहे. मुंबई येथील महसूल विभागाच्या मुख्यालयापासून उपक्रमाला सुरुवात होत असून, दर रविवारी प्रत्येक जिल्ह्यात सायंकाळी ७ ते ८ या वेळेत कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
वीरश्री व संगीत यांचा मिलाफ असलेला पोलीस बँड, संरक्षण बँड, वैभवी गौरवगाथेचे कथन करणारे लघुपट, सांस्कृतिक वारशाचे लोककलेद्वारे दर्शन कलांगण उपक्रमाद्वारे नागरिकांना घडविण्याचा उद्देश आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य भागात व सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतील. त्यामुळे नागरिकांना पाहण्यासाठी ते सहज उपलब्ध होतील. पुण्यात शनिवारवाडा, कोल्हापूर येथे रंकाळा तलाव, औरंगाबाद, नाशिक,
जळगाव, नागपूर, चंद्रपूर,
अमरावती आणि बुलढाणा येथे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत, असे तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)