सुपे-बाबुर्डी ग्रामपंचायतीवर काळभैरवनाथ आणि भैरवनाथ पॅनेलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:24+5:302021-01-19T04:12:24+5:30

येथील ९ जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्याने राहिलेल्या ६ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये लढत होऊन विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे ...

Kalbhairavnath and Bhairavnath panels dominate Supe-Baburdi Gram Panchayat | सुपे-बाबुर्डी ग्रामपंचायतीवर काळभैरवनाथ आणि भैरवनाथ पॅनेलचे वर्चस्व

सुपे-बाबुर्डी ग्रामपंचायतीवर काळभैरवनाथ आणि भैरवनाथ पॅनेलचे वर्चस्व

Next

येथील ९ जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्याने राहिलेल्या ६ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये लढत होऊन विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे - प्रभाग १ - शारदा नितीन लडकत यांना ३५२ मते मिळाली. तर नानासाहेब तुळशीराम लडकत, रुपाली सचिन लडकत ( बिनविरोध ), प्रभाग २ - दत्तात्रय सुखदेव ढोपरे यांना ४५६ तर दीपाली योगेश जगताप यांना ४९७ मते मिळाली. तर मनिषा गोविंद बाचकर ( बिनविरोध ). प्रभाग ३ - ज्ञानेश्वर बाळासो पोमणे यांना ४०३ मते, अर्चना भानुदास पोमणे यांना ४४७ मते, मंगल दत्तात्रय लव्हे यांनी ३३३ मते मिळवून विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाजीराव सूर्यवंशी यांनी दिली.

प्रभाग क्रमांक १ मधून दोन जागा बिनविरोध, तर राहिलेल्या एका जागेसाठी विद्यमान सदस्या शारदा नितीन लडकत यांच्याकडून माजी सरपंच सुजाता सुरेश गायकवाड यांना ८१ मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले.

प्रभाग क्रमांक २ मधून रामभाऊ ढोपरे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलच्या मनीषा गोविंद बाचकर या बिनविरोध झाल्या. तर राहिलेल्या दोन जागांसाठी भैरवनाथ पॅनलचे दत्तात्रय सुखदेव ढोपरे आणि दीपाली योगेश जगताप यांच्याकडून समाधान दत्तात्रय देशमुख यांना २३८ मतांनी, तर विद्यमान सरपंच अनिता वाल्मीक जगताप यांना ३२९ मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले.

तर, प्रभाग क्रमांक ३ मध्ये हौसिराम पोमणे आणि सोनबा लव्हे यांच्या नेतृत्वाखालील काळभैरवनाथ पॅनेलने येथील भैरवनाथ जोगेश्वरी पॅनलला पराभूत केले. भैरवनाथ जोगेश्वरी पॅनेलचे नेतृत्व जयराम बाराते, पुरुषोत्तम पोमणे, धोंडीबा पोमणे, विश्वनाथ पोमणे हे करीत होते. मात्र त्यांना तीनपैकी एकही जागा जिंकता आली नाही. त्यांचे उमेदवार रामभाऊ चंद्रकांत पोमणे यांना २०१ मतांनी, माधुरी नीलेश पोमणे यांना २०३ मतांनी तर सविता मिलिंद पोमणे यांना ११८ मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले.

.

Web Title: Kalbhairavnath and Bhairavnath panels dominate Supe-Baburdi Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.