महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना 1 दिवसाची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:16 PM2022-01-05T17:16:03+5:302022-01-05T17:39:20+5:30

कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी घेतले रायपूरहून ताब्यात घेतले होते...

Kalicharan Maharaj remanded in police custody for 1 day | महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना 1 दिवसाची पोलीस कोठडी

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना 1 दिवसाची पोलीस कोठडी

googlenewsNext

पुणे : महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी कालीचरण (kalicharan maharaj) महाराजांना 1 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात महाराज समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. कोर्ट रूममध्ये गर्दी झाल्याने वादावादीही झाली होती. त्याचवेळी महाराज समर्थकांनी घोषणाबाजीही केली. पुण्यातील शिवप्रताप दिन कार्यक्रमात समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले की, कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या ३ -४ दिवसांपासून पोलीस पथक रायपूरमध्ये होते. न्यायालयातून ट्रॉझिंट वॉरंट घेऊन मंगळवारी सायंकाळी कालीचरण महाराज यांना ताब्यात घेऊन पुण्यात आणले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावरही गुन्हा दाखल आहेत. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Web Title: Kalicharan Maharaj remanded in police custody for 1 day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.