कल्याण गायकवाडांना ‘मराठवाडारत्न’
By admin | Published: September 19, 2014 11:36 PM2014-09-19T23:36:52+5:302014-09-19T23:36:52+5:30
प्रसिद्ध गायक भजनसम्राट पं. कल्याण गायकवाड यांना मराठवाडार} पुरस्काराने गौरविण्यात आले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Next
चाकण : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा फेस्टिव्हल संयोजन समितीतर्फे संगीत क्षेत्रत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आळंदी देवाची (खेड) येथील प्रसिद्ध गायक भजनसम्राट पं. कल्याण गायकवाड यांना मराठवाडार} पुरस्काराने गौरविण्यात आले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाटय़गृहात पुरस्कार वितरण झाले. पुरस्काराचे हे पहिले वर्ष आहे .
या वेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, महावितरण मुंबई शाखेचे मुख्य व्यवस्थापक मुरहरी केळे, इंद्रायणी सहकारी बँकेचे अध्यक्ष सत्यनारायण चांडक, नीलकंठ वाडेकर, आमदार विलास लांडे, महापौर शकुंतला धराडे, स्थायी समिती सभापती महेश लांडगे, एकनाथ पवार, नगरसेविका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.
मराठवाडा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा कणा असल्याचे मत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. संयोजन समितीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
या वेळी पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेले मराठवाडय़ातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते . (वार्ताहर )