कमलबाई चोरडिया यांचे वृद्धापकाळाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:41 PM2020-02-11T23:41:44+5:302020-02-11T23:42:46+5:30
प्रवीण उद्योग समुहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ह्यमसालाह्णहा मराठी चित्रपटही कमलबाई यांच्या जीवन प्रवासावर आधारलेला होता.
पुणे : प्रवीण उद्योग समुहाचा पाया घालणाऱ्या कमलबाई हुकमीचंद चोरडिया (वय ८६) यांचे मंगळवारी सायंकाळी सात वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. बुधवारी सकाळी दहा वाजता स्वागत बंगला, मोतीबाग सोसायटी येथून अंत्ययात्रा निघेल. नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
कमलाबाई त्यांच्या पश्चात चार मुले राजकुमार, प्रवीण, प्रदीप आणि धन्यकुमार तसेच विशाल, आनंद, अमित आणि गौरव हे नातू यांच्यासह नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.
पुण्यातील भंडारी कुटुंबातील असलेल्या कमलबाई यांचा ६८ वर्षांपूर्वी हुकुमीचंद चोरडिया यांच्याशी विवाह झाला. हुकमीचंद हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आहेत. वडगाव-धायरी परिसरामध्ये चोरडियांचे किराणा मालाचे दुकान होते. दोघांनी सोबतीने १९६२ साली प्रवीण उद्योग समुहाचा पाया रचला. सुरवतीला ह्यआनंद मसालाह्ण या नावाने या व्यवसायात पाऊल ठेवले. कमलाबाई यांच्या हाताला चव असल्याने त्यांनी इतरांशी स्पर्धा न करता आपला वेगळा ब्रॅँड प्रस्थापित केला. कमलाबाई स्वत: दररोज २५-२५ किलोंचा मसाला कुटून देत असत. तो मसाला हुकमीचंद सायकलवर घेऊन सोलापुरात विकायला नेत. काही काळानंतर पुण्यात येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या कारकीर्दीवर ह्यबिकट वाट यशाचीह्ण या नावाने त्यांच्या स्नुषा मधुबाला चोरडिया यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तकही प्रसिद्ध आहे. प्रवीण उद्योग समुहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ह्यमसालाह्णहा मराठी चित्रपटही कमलबाई यांच्या जीवन प्रवासावर आधारलेला होता.
अत्यंत कुटुंबवत्सल असलेल्या कमलबाई यांना सर्वजण ह्यबाईह्णया आदरार्थी नावाने संबोधत असत. विविध सामाजिक संस्थांशी देखील त्या अनेक वर्षे जोडल्या गेल्या होत्या.