बाळासाहेब बारवकर यांना कामगारभूषण पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:34+5:302021-02-11T04:13:34+5:30
पुरंदर - बारामतीतील एका खासगी कंपनीतीतल कामगार बाळासाहेब बारवकर यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ...
पुरंदर - बारामतीतील एका खासगी कंपनीतीतल कामगार बाळासाहेब बारवकर यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा २०१६ चा कामगारभूषण आणि २०१७ चा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देण्यात आला आहे.
०९ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
राज्यातील प्रत्येक विभागातील कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना शासना मार्फत दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यासाठी दर वर्षी राज्यातून अर्ज मागवून मुलाखती घेऊन अंतिम ५० ते ५५ कामगारांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. सन्मानचिन्ह, २५ हजार रोख आणि शाल - श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
फोटो क्रमांक : १० नीरा गुणवंत कामगार
फोटोओळ :- राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते बाळासाहेब बारवकर यांना कामगार भुषण आणि गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.