कान्होजी, संताजींच्या पुतळ्यांचे अनावरण
By Admin | Published: February 21, 2015 01:56 AM2015-02-21T01:56:10+5:302015-02-21T01:56:10+5:30
शिवरायांना साथ देणारे सरदार कान्होजी नाईक-जेधे व गनिमी कावा युद्धनीती धुरंधर, अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळयाचे अनावरण
पुणे : स्वराज्यनिष्ठा वेळोवेळी प्रकट करणारे आणि शिवरायांना साथ देणारे सरदार कान्होजी नाईक-जेधे व गनिमी कावा युद्धनीती धुरंधर, अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळयाचे अनावरण युवराज शहाजीराजे, संभाजीराजे छत्रपती, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिलीप मोहिते व शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते झाले.
अनावरण प्रसंगी बोलताना शहाजीराजे म्हणाले, ‘‘सरदार कान्होजी जेधे व सरसेनापती संताजी घोरपडे या दोन थोर स्वराज्य सेनानींचा श्री शिवछत्रपतींनी स्थापिलेल्या स्वराज्य रक्षण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. ह्या शूरवीरांच्या गौरवशाली इतिहासाला न्याय देणारे अतिशय सुंदर पुतळे बनविल्याबद्दल जेधे आणि घोरपडे कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यात आले. कान्होजी जेधे यांच्या पुतळयाची उंची तब्बल ८ फूट आहे. पुतळा बनविण्यासाठी नीलेश राजाराम जेधे आणि दिग्विजय सर्जेराव जेधे तर, संताजींचा पुतळा साकारण्यात रोहित घोरपडे आणि गिरीश घोरपडे यांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी)
२०१४ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळयाचे अनावरण होऊन सुरू झालेली प्रथा ह्या वर्षी २०१५ लाही ह्या दोन थोर वीरांच्या पुतळा अनावरणाने सुरूच राहिली आणि पुढच्या वेळेस अनेक स्वराज्यवीरांचे पुतळ्यांचे अनावरण स्वराज्यरथ सोहळ्यामध्ये होईल आणि हा सोहळा वैशिष्टयपूर्ण ठरेल.
- अमित गायकवाड, अध्यक्ष, शिवजयंती महोत्सव समिती