कापूरहोळ-नारायणपूर रस्ता असुरक्षित

By admin | Published: June 30, 2017 03:34 AM2017-06-30T03:34:05+5:302017-06-30T03:34:05+5:30

अरुंद रस्ता, साईडपट्ट्या खोलवर गेलेल्या, संरक्षक कठडे नाहीत, ठिकठिकाणी रस्त्याला पडलेले खड्डे, सूचनाफलक नाहीत, गटारे गाळाने भरलेली

Kapurohal-Narayanpur road is unsafe | कापूरहोळ-नारायणपूर रस्ता असुरक्षित

कापूरहोळ-नारायणपूर रस्ता असुरक्षित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : अरुंद रस्ता, साईडपट्ट्या खोलवर गेलेल्या, संरक्षक कठडे नाहीत, ठिकठिकाणी रस्त्याला पडलेले खड्डे, सूचनाफलक नाहीत, गटारे गाळाने भरलेली, झाडेझुडपे वाढलेली... ही परिस्थिती आहे कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्याची. यामुळे एखादा अपघात होण्याच्या भीतीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळपासून सुमारे १० किलोमीटरवर असलेले नारायणपूर हे महाराष्ट्रतील अनेक भाविकभक्तांचे श्रद्धास्थान व धार्मिक स्थळ आहे. यामुळे दर गुरुवारी व पौैर्णिमेला सुमारे एक लाखापर्यंत भाविक आणि २५ हजार वाहने ये जा करीत असतात. शिवाय हडपसरला रेल्वेचा डेपो असल्याने आणि खेडशिवापूर टोलनाक्यावर टोल द्यावा लागतो, यामुळे सिमेंटसह विविध प्रकारचा माल घेऊन जाणारे ट्रक आणि डिझेल, पेट्रोल घेऊन जाणारे टँकर ही जडवाहाने याच मार्गाचा वापर करतात. दररोज सुमारे ५ हजार वाहने प्रवास करतात. यामुळे सदर मार्गावर वाहनांची सतत गर्दी राहते. यातून वाहतूककोंडी होते. रस्त्याला खड्डेही पडतात.
कापूरव्होळ चौकात उड्डाणपूल नसल्याने नारायणपूरला जाणाऱ्या भाविकांना सुमारे २ किलोमीटरचा वळसा घेऊन परत यावे लागते. शिवाय साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. त्यातच रस्त्यावर भाजीपाला विकणारे बसलेले असतात. यामुळे दररोज वाहतुकीचा पुरता खोळंबा होतो. याकडे महामार्ग पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
हा रस्ता अत्यंत अरुंद असून, चिव्हेवाडी गावाजवळ अनेक अरुंद वळणे आहेत. गावाच्या पुढील घाटातील रस्ता साईडपट्ट्या खोलवर गेलेल्या, गटारे नाहीत व अरुंद रस्ता यामुळे वाहनांच्या अनेकदा रांगा लागतात. घाटात व अनेक ठिकाणच्या वळणावर सूचनाफलक आणि संरक्षक कठडेही नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री अपघात होण्याची भीती असते.

Web Title: Kapurohal-Narayanpur road is unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.