पोलिसी कारवाईने कापूरव्होळ चौकाने मोकळा श्वास घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:57+5:302021-09-21T04:12:57+5:30

कापूरव्होळ चौकात यापूर्वी लुटीपुटीच्या कारवाई झाल्याने थोड्याच वेळात पुन्हा जैसे थे परिस्थिती होऊन टपऱ्या व अवैध वाहने रस्त्यावर उभी ...

Kapurvhol Chowk breathed a sigh of relief at the police action | पोलिसी कारवाईने कापूरव्होळ चौकाने मोकळा श्वास घेतला

पोलिसी कारवाईने कापूरव्होळ चौकाने मोकळा श्वास घेतला

Next

कापूरव्होळ चौकात यापूर्वी लुटीपुटीच्या कारवाई झाल्याने थोड्याच वेळात पुन्हा जैसे थे परिस्थिती होऊन टपऱ्या व अवैध वाहने रस्त्यावर उभी करून चौकाचा श्वास कोंडत होता. पुन्हा रस्त्यावर टपरी मांडल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा या वेळी निरीक्षक पाटील यांनी संबंधितांना दिला आहे.

कापूरव्होळ चौक पुणे-सातारा महामार्गालगत आहे. हा चौक नेहमीच अवैध वाहतुकीच्या वाहनांनी गजबलेल्या असायचा. त्याचबरोबर चौकात खाद्यपदार्थ, चहा, फळे व इतर वस्तूंच्या टपऱ्या परवानाधारक असल्याप्रमाणे रस्त्यावरच मांडल्या जात. त्यामुळे याठिकाणी कायमच वाहतुकीची कोंडी प्रवाशांची गर्दी असे. त्यातच पीमपीएमएल व एसटी बस धोकादायक पद्धतीने उभ्या राहून सासवड, भोर, शिरवळ, सातारा व कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवासी नागरिकांची गर्दी असते.

प्रवाशांना, नागरिकांना रस्त्यावर धोकादायकपणे उभे राहून एसटी, पीएमपीएल बसची वाट पाहावी लागत असे. याकरिता पो.नि. सचिन पाटील यांनी पंचायतीचे उपसरपंच पंकज गाडे, पोलीस पाटील सय्यद शेख,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांशी संवाद साधून चौक बैठक घेऊन पुन्हा टपऱ्या रस्त्यावर येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

---

चौकट

बसथांब्यासाठी पत्रव्यवहार

चौकात एसटी, पीएमपीएल बस महामार्गावर थांबत असल्याने सर्वांच्या दृष्टीने धोकादायक आहे. या सार्वजनिक वाहनांचा थांबा रस्त्यालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावर घेतल्यास महामार्गावरील मुख्यरस्ता मोकळा राहणार आहे. याकरिता ग्रामस्थ आणि सार्वजानिक वाहतूक करणाऱ्या एसटीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावत महामार्गाच्या दोन्ही बाजूस लोखंडी कठडे बसविले जावेत यासाठी महामार्ग प्रकल्प संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

---

फोटो क्रमांक : २०कापूरहोळ अतिक्रमण काढले

सोबत फोटो व ओळ : कापूरव्होळ (ता.भोर) चौक येथे पोलिसी कारवाईने कापूरव्होळ चौक टपऱ्यामुक्त झाला.

200921\1846-img-20210919-wa0014.jpg~200921\1846-img-20210919-wa0012.jpg

सोबत फोटो व ओळ : कापुरव्होळ(ता.भोर) चौक येथे पोलिसी कारवाईने कापुरव्होळ चौक टपऱ्यामुक्त झाला.

~???? ???? ? ?? : ??????????(??.???) ??? ???? ?????? ???????? ?????????? ??? ??????????? ????.

Web Title: Kapurvhol Chowk breathed a sigh of relief at the police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.