बहिष्कृत करणार्या पंचाना तत्काळ अटक करापप्रविण दरेकर : अधिवेशनात उठविणार आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:11 AM2020-12-06T04:11:44+5:302020-12-06T04:11:44+5:30
पुणे : जात पंचायत भरवून निवाडा करत एका जोडप्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी निवाडा करणार्या पंचांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ...
पुणे : जात पंचायत भरवून निवाडा करत एका जोडप्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी निवाडा करणार्या पंचांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विधान परिषदेच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे केली.
प्रविण दरेकर यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक देशमुख यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेऊन पंचांना अटक करण्याची मागणी केली.
अंधश्रंद्धा निर्मलन समितीच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला असून सासवड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्याचे समजताच हे पंच आरोपी अद्याप फरार झाले आहेत.
याबाबत प्रविण दरेकर यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. त्यांना अटक करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. येत्या अधिवेशनात असे प्रकार रोखले जावेत, यासाठी आपण आवाज उठविणार आहोत, असे त्यांनी सांगितले.