कारेगावची चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:56+5:302021-08-13T04:14:56+5:30
कारेगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे तांदूळ,गहू, ज्वारी व बाजरी हे अन्नधान्य तर तेल, ...
कारेगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे तांदूळ,गहू, ज्वारी व बाजरी हे अन्नधान्य तर तेल, डाळी, मसाले, साबण, साखर आदी जीवनाश्यक वस्तू जमा करत ते चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याचे कारेगावचे युवा उद्योजक शुभम नवले यांनी सांगितले. आंबेगाव - शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूरग्रस्तांना मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, उपसरपंच अजित कोहकडे, ग्रामपंचायत सदस्य तुषार नवले, संदीप नवले, शहाजी तळेकर,नागेश शेलार, पृथ्वीराज नवले, विजय खेडकर उपस्थित होते. दरम्यान, मानसिंग पाचुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेसांगवी, पिंपरी दुमाला,वाघाळे,वरुडे, खंडाळे, गणेगाव खालसा, चिंचोली मोराची व निमगाव भोगी येथील ग्रामस्थांच्यावतीनेही पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात आली.
१२ रांजणगाव गणपती
कारेगाव येथील ग्रामस्थांनी पूरग्रस्तांसाठी जमा केलेले साहित्य.