कारगिल विजय दिनानिमित्त ‘कारगिल गौरव पुरस्कार’ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:42+5:302021-07-24T04:09:42+5:30
पुणे : कारगिल विजय दिवसानिमित्त सरहद आणि लडाख पोलिसाच्या वतीने कारगिल गौरव पुरस्कार ै़प्रदान सोहळा सोमवारी २५ जुलै रोजी ...
पुणे : कारगिल विजय दिवसानिमित्त सरहद आणि लडाख पोलिसाच्या वतीने कारगिल गौरव पुरस्कार ै़प्रदान सोहळा सोमवारी २५ जुलै रोजी होणार आहे. तसेच २६ जुलै रोजी कारगिल सद्भावना दौडचे आयोजनही केल्याची माहिती सुरेंद्र वधवा आणि संजीव शहा यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.
यंदाचा कारगिल गौरव पुरस्कार ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी केलेल्या पत्रकारितेतील कामगिरीबद्दल, तर पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांना सामाजिक पुरस्कार प्रदान होईल. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल आगा सैय्यद अब्बास रिझवी एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर लेह-कारगिल (राज्यमंत्री दर्जा) यांना तेथील जवानांना केलेल्या मदतीसाठी तसेच राकेश भान, डॉ. अपश्चिम बरंठ, डॉ. विजय कळमकर, धारावीतील डॉ. अनिल पाचणेकर यांना हा पुरस्कार प्रदान होईल. प्रदान सोहळा २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार तसेच पिंपरी-चिंचवडचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत मुकुंदनगर येथे होणार आहे. कृष्ण प्रकाश यांचा विशेष सन्मान होणार आहे.
तसेच २६ जुलै सकाळी ६.३० वाजता शनिवारवाडा येथून राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत कारगिल सद्भावना दौड काढण्यात येणार आहे. त्याचा फ्लॅग ऑफ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होईल. दौडचा समारोप युद्ध स्मारकाजवळ मेजर जनरल आय. जी. सिंग, जीएमओ, दक्षिण महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत होईल. या दौडमध्ये समन्वय हे राजेश पांडे करीत आहेत. याप्रसंगी कृष्णकुमार गोयल, संतसिंग मोखा, सुरेंद्र वधवा, चरणजितसिंग सहानी तसेच पूर्णिमा गायकवाड-खंदारे उपस्थित राहणार आहे.