शेटफळगढे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:52+5:302021-09-24T04:11:52+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे होते. स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे, बाळासाहेब ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे होते. स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे, बाळासाहेब भोसले व सुबोध अवचट, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप जगदाळे उपस्थित होते. यावेळी हनुमंतराव वाबळे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. काशिनाथ सोलनकर लिखित कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वेगळेपण सांगणाऱ्या युगप्रवर्तक कर्मवीर या पुस्तकाच्या प्रती विद्यालयाच्या ग्रंथालयास भेट देण्यात आल्या.
यावेळी बाळासाहेब भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेचे आपण विद्यार्थी असल्याची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, तर जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील वेचक प्रसंग सांगून कर्मवीर अण्णांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात करावेत असे आवाहन केले. प्राचार्य दिलीप जगदाळे व डॉ. काशिनाथ सोलनकर यांनी आपल्या भाषणातून कर्मवीरांचा जीवनपट व कर्मवीर अण्णांचे आंतरराष्ट्रीय स्थान विषद केले. अथर्व अवचट या विद्यार्थ्यानेही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तात्यासाहेब गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन एन. डी. दराडे यांनी केले. या कार्यक्रमात गुगल ॲपद्वारे दोनशे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
230921/img-20210923-wa0091.jpg
कर्मवीरांच्या प्रतिमेचे पुजन करताना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य व अन्य