कर्मवीर भाऊराव पाटील यांना गोरगरिबांच्या अडचणी कळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:03+5:302021-02-15T04:12:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना गोरगरिबांच्या अडचणी कळल्या. त्यातून त्यांनी गोरगरिबांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना गोरगरिबांच्या अडचणी कळल्या. त्यातून त्यांनी गोरगरिबांना शिक्षण देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष निर्माण केला, असे मत पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल या रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सदस्य जाकीर खान पठाण, प्राचार्य डोगरे मॅडम, पर्यवेक्षक चौधरी सर, रोहिले सर, सामाजिक कार्यकर्ते
बाबुराव पाचंगे, प्रवीण ओस्तवाल, जगदीश पाचर्णे तसेच शिक्षक उपस्थित होते.
मुलांना अनाथ म्हणून नाही तर त्यांचे गणगोत म्हणून या मुलांना सांभाळावे, असे सांगून रयत शिक्षण संस्थेतील हा सत्कार माहेरचा सत्कार असल्याचे सिंधुताई सपकाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सिंधुताई सपकाळ यांना संस्थेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीर खान पठाण व प्राचार्य डोगरे मॅडम, सन्मानपत्र देऊन गौरव
करण्यात आला. प्रवीण ओस्तवाल व जगदीश पाचर्णे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमशाळेतील
२४ मुलांना शाळेचा शैक्षणिक साहित्य
दिले.
रयत शिक्षण संस्थेचे कार्य अखंडपणे चालू असून सर्वसामान्य समाज व शिक्षकवृंद यांच्या सहकार्यातून चालू असून संस्थेचे शिक्षक
कृतज्ञतनिधी पगारातून देत असतात. त्याप्रमाणे सिंधुताई सपकाळ यांचे कार्य अखंड चालू
असल्याचे जाकीर खान पठाण यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य डोंगरे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन रोहिले सर
यांनी केले. आभार चौधरी सर यांनी मानले.
फोटो :
शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल या रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीर खान पठाण, पदमश्री सिंधुताई सपकाळ तसेच उपस्थित मान्यवर.