कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा ऊस लागवड हंगाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:08+5:302021-06-11T04:09:08+5:30
परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांना ऊस लागवड हंगाम २०२१ -२२ लागवड होणाऱ्या ...
परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांना ऊस लागवड हंगाम २०२१ -२२ लागवड होणाऱ्या उसाचे वेळेत गळीत होण्यासाठी व एकरी ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ऊस लागवड हंगाम धोरण राबवले असून सभासदाने ऊस लागवड करण्यापूर्वी मातीपरीक्षण करून घेणे आवश्यक आहे.
सभासदांनी ऊस लागवड करतेवेळी नऊ ते दहा महिने वयाचे ऊस बेणे वापरावे, ऊस लागवड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. सभासदाने ऊस लागवड करतेवेळी ऊस उत्पादनवाढीसाठी कारखान्याने तयार केलेल्या कर्मयोगी सेंद्रिय खत व कर्मयोगी जिवाणू खताचा वापर करावा, असेही आवाहन यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पद्माताई भोसले, कार्यकारी संचालक देवराव लोकरे आणि संचालक मंडळाने केले आहे.
--
फोटो ओळ : हर्षवर्धन पाटील