‘कर्मयोगी’ जादा दर देईल

By admin | Published: October 30, 2014 11:05 PM2014-10-30T23:05:58+5:302014-10-30T23:05:58+5:30

गतवर्षी गाळपास आलेल्या उसास कर्मयोगी कारखाना तालुक्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा जादा दर देईल.

'Karmayogi' will give an additional rate | ‘कर्मयोगी’ जादा दर देईल

‘कर्मयोगी’ जादा दर देईल

Next
इंदापूर : गतवर्षी गाळपास आलेल्या उसास कर्मयोगी कारखाना तालुक्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा जादा दर देईल. 
तसेच, कामगारांच्या 3क् टक्के बोनसची रक्कम चार दिवसांत त्यांच्या बँक खात्यावर जमा 
करण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या पंचविसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील आणि भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते 
पार पडला. 
पाटील म्हणाले, की चालू ऊसगळीत हंगामात कारखान्याकडे सभासदांचा साडेतेरा लाख टन 
व कार्यक्षेत्रबाहेरील दोन लाख 
टन ऊस उपलब्ध आहे. चालू हंगामासाठी 1651 बैलगाडय़ा, 
227 ट्रॅक्टर आदी वाहनांशी करार झालेले आहेत. वेळेत गाळप पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. पुढील वर्षीच्या गळीत हंगामासाठी 11 हजार 284 एकर ऊस कारखान्याकडे उपलब्ध आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानदेव बनकर यांनी प्रास्ताविक केले. शरद काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर बबन लावंड यांनी आभार मानले. या वेळी सर्व सभासद, अधिका:यांसह कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: 'Karmayogi' will give an additional rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.