Hijab Controversy: कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रातही पडसाद; पुण्यात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 11:28 AM2022-02-10T11:28:11+5:302022-02-10T11:59:49+5:30

जाणून घ्या काय आहे प्रकरण...

karnataka hijab controversy reverberates in maharashtra ncp protest movement pune | Hijab Controversy: कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रातही पडसाद; पुण्यात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

Hijab Controversy: कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रातही पडसाद; पुण्यात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

googlenewsNext

पुणे: सध्या कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू असलेला वाद (Karnataka Hijab Controversy) देशभर गाजत आहे. मुस्लीम समुदायाच्या मुलींना कॉलेजमध्ये हिजाब वापरल्याने कॉलेजमध्ये प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे मुस्लीम समुदायातील मुलींना या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले होते. कर्नाटकमधील या प्रकाराचे महाराष्ट्रातही पडसाद पडत आहेत. मुस्लीम समुदायातील मुलींना पाठींबा दर्शवण्यासाठी आज पुण्यातील महात्मा फुले वाड्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध आंदोलन केले. कर्नाटकमधील भाजप सरकारचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला.

या आंदोलनाप्रसंगी महिला देशातील विविध परंपरांच्या वेशभूषेत आल्या होत्या. कर्नाटकमधील काही कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाबवर बंदी घालण्याची मागणी याचिका उच्च न्यायालयात नोंदवली गेली होती. 'कर्नाटकात मुस्लीम मुलींसोबत झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. देशात भाजप आणि आरएसएस सध्या महिलांचे जीवन असुरक्षित करत आहेत', असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. 

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटकात वादंग निर्माण झाला आहे. हिजाब घालणाऱ्या युवतींचा विरोध म्हणून काही संघटना भगवी शाल अंगावर घालून कॉलेजमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: karnataka hijab controversy reverberates in maharashtra ncp protest movement pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.