करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 07:37 PM2022-06-29T19:37:54+5:302022-06-29T19:38:05+5:30

करुणा शर्मा व तिचा साथीदार यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी अंतर्गत तसेच महिलेला धमकावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Karuna Sharma temporary bail rejected | करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला

करुणा शर्माचा तात्पुरता जामीन फेटाळला

googlenewsNext

पुणे: करुणा शर्मा व तिचा साथीदार यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी अंतर्गत तसेच महिलेला धमकावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये करुणा शर्मा ही सध्या येरवडा कारागृहात मध्ये बंदिस्त आहे. करुणा शर्माच्या वतीने विशेष सत्र न्यायालयात तात्पुरता जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. 

त्यावेळी पीडित महिलेचे व फिर्यादीचे वकील ॲड. ठोंबरे यांनी करुणा शर्माचा तात्पुरता जामीन अर्ज हा कायद्यास धरून नसल्याचे सांगितले व करून शर्मा यांच्याविरुद्ध यापूर्वी देखील ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचा युक्तिवाद केला. त्यावेळी ॲड. ठोंबरे यांचा युक्तिवाद मान्य करत विशेष सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी करुणा शर्माचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यावेळी पीडित महिलेने तर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. आशुतोष शेळके व विष्णू होगे यांनी काम पाहिले.

 येरवडा येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिचे पती व करुणा शर्मा मुंढे हिच्यावर शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते. हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे एक पथक मुंबईला रवाना झाले होते. त्यांनी करुणा शर्मा मुंढे व तिचा सचिव आणि फिर्यादीचा पती यांना मुंबईतील घरातून ताब्यात घेऊन पुण्यात आणले. दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर करुणा शर्मा ही सध्या येरवडा कारागृहात मध्ये बंदिस्त होती. 

Web Title: Karuna Sharma temporary bail rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.