Pune Election Breaking: कसबा विधानसभा आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:34 PM2023-01-18T15:34:33+5:302023-01-18T16:04:06+5:30
27 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रातील या दोन विधानसभा मतदार संघात 27 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचीही उत्सुकता असणार आहे.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
- निवडणुकीची अधिसूचना जाहीर : ३१ जानेवारी २०२३
- अर्ज दाखल करण्याची मुदत : ७ फेब्रुवारी २०२३
- अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी
- अर्ज मागं घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी
- मतदान : २७ फेब्रुवारी
- निकाल : २ मार्च