Kasba Chinchwad By Election: दिवसभर शुकशुकाट, संध्याकाळी गर्दी; पुणेकरांचे पोटनिवडणुकीत वेगळेच गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:48 AM2023-02-27T06:48:48+5:302023-02-27T06:49:26+5:30

कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ४५% मतदान, दोन्ही मतदारसंघांत हाणामारीचे प्रकार

Kasba Chinchwad By Election: rush in the evening for voting, count reached to 45 percent | Kasba Chinchwad By Election: दिवसभर शुकशुकाट, संध्याकाळी गर्दी; पुणेकरांचे पोटनिवडणुकीत वेगळेच गणित

Kasba Chinchwad By Election: दिवसभर शुकशुकाट, संध्याकाळी गर्दी; पुणेकरांचे पोटनिवडणुकीत वेगळेच गणित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. कसबा मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत अवघे ४५.२५ टक्के मतदान झाले हाेते; तर चिंचवड मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी गुरुवार, दि. २ मार्चला होणार असून,  निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  

कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने  यांच्यात थेट लढत झाली. भाजपचे माजी नगरसेवक, सभागृह नेते  गणेश  बिडकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला. 

चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात चुरशीची लढत झाली.

Web Title: Kasba Chinchwad By Election: rush in the evening for voting, count reached to 45 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.