Kasba By Election: राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ईव्हीएम मशीनसोबत फोटो काढला; कसब्यात गोपनीयतेचा भंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 11:52 AM2023-02-26T11:52:31+5:302023-02-26T11:53:11+5:30

कसबा पोटनिवडणुकीत सकाळी नऊ वाजे पर्यंत 6.5 टक्के मतदान झाले. मतदानाला लोकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे.

Kasba Chinchwad By Elections: NCP's Rupali Thombre Patal took a picture of the EVM machine; Breach of privacy of voting | Kasba By Election: राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ईव्हीएम मशीनसोबत फोटो काढला; कसब्यात गोपनीयतेचा भंग 

Kasba By Election: राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ईव्हीएम मशीनसोबत फोटो काढला; कसब्यात गोपनीयतेचा भंग 

googlenewsNext

तिकडे चिंचवड मतदारसंघात भाजपाचे माजी नगरसेवक आणि अपक्ष उमेदवार समर्थकांमध्ये हाणामारीचा प्रकार समोर आलेला असताना कसबा मतदारसंघात रुपाली ठोंबरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. 

Kasba By Election: कसब्यात पोटनिवडणूक लागलीय! मुलगी थेट लंडनहून मतदानाला आली, २४ तासांचा प्रवास तरी...

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला आहे. हा फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामुळे मतदानाच्या गुप्तदानाच्या गोपनियतेचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 
मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी आत मोबाईल नेला कसा, निवडणूक आयोग काय कारवाई करणार आदी प्रश्न त्यांच्या पोस्टवर विचारले जात आहेत. 

पोटनिवडणूक: चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार- भाजपा समर्थक भिडले; पोलिसांसमोरच हाणामारी

कसबा पोटनिवडणुकीत सकाळी नऊ वाजे पर्यंत 6.5 टक्के मतदान झाले. मतदानाला लोकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात कसबा आणि चिंचवड मतदारसंघांत पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. मोठमोठ्या हे दोन्ही मतदारसंघ पिंजून काढले आहेत. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. असे असताना प्रचारावेळी तापलेल्या वातावरणाचे पडसाद मतदानादिवशी दिसून आले आहेत. चिंचवडमध्ये सकाळी सकाळीच अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांत आणि भाजपाच्या माजी नगरसेवकांत हाणामारीचा प्रकार घडला आहे. 

Web Title: Kasba Chinchwad By Elections: NCP's Rupali Thombre Patal took a picture of the EVM machine; Breach of privacy of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.