पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:21 AM2024-09-17T11:21:27+5:302024-09-17T11:23:17+5:30
पहिला गणपती कसबा गणपती असा जयघोष करत बाप्पा पालखीतून टिळक चौकाकडे मार्गस्थ झाला.
पुणे: ढोल ताशाचा गजर अन् मोरयाचा जयघोषात पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती समाधान चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ झाला.
दरवर्षी आपल्या तालाने मंत्रमुग्ध करणारे रमणबाग ढोल ताशा पथकाने समाधान चौकात आकर्षक वादन केले. त्यानंतर रुद्रगर्जना पथकाने ठेका धरत नागरिकांचा उत्साह वाढवला. सोबतच गणरायाच्या गाण्यांची साथ देत प्रभात बँडने आपले वादन केले.
पहिला गणपती कसबा गणपती असा जयघोष करत बाप्पा पालखीतून टिळक चौकाकडे मार्गस्थ झाला.
पालखीतून बाप्पांचे विसर्जन
दरवर्षी कसबा गणपतीचे परंपरेनुसार पालखीतून विसर्जन केले जाते. मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित लोक पालखीला खांदा देतात. पालखीच्या बाजूने अब्दागिरी, सांस्कृतिक वेशभूषेत असणाऱ्या महिला, पदाधिकारी मिरवणुकीचे आकर्षण ठरत असते.