Kasba Peth By-Election | कसब्यात पकडले १० हजारांचे मद्य; पोलिसांचा कडक बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:02 AM2023-02-16T10:02:36+5:302023-02-16T10:05:02+5:30

२९९ ज्येष्ठ करणार टपाली मतदान...

Kasba Peth By-Election Liquor worth 10 thousand was caught in the kasba election | Kasba Peth By-Election | कसब्यात पकडले १० हजारांचे मद्य; पोलिसांचा कडक बंदोबस्त

Kasba Peth By-Election | कसब्यात पकडले १० हजारांचे मद्य; पोलिसांचा कडक बंदोबस्त

googlenewsNext

पुणे :कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत असून, विशेष पथकांमार्फत आतापर्यंत २४ फलक, ३८९ पोस्टर्स व ६६ झेंडे काढण्यात आले आहेत. पोलिसांमार्फत विविध ९ तपासणी नाक्यांवर दररोज ३ पाळ्यांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येत असून, आजपर्यंत ९ हजार ८२५ रुपये किमतीची १८३ लिटर दारू हस्तगत करण्यात आली आहे.

उमेदवारांच्या सुविधेसाठी कसबा पेठ मतदारसंघाच्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली आहे. विविध पक्षांचे, तसेच अपक्ष उमेदवार यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयामार्फत आतापर्यंत ५ सभा, ६६ पदयात्रा, १० वाहन परवाने, ७ तात्पुरती पक्ष कार्यालये, स्टेज इत्यादीसाठी परवाना पत्र देण्यात आले आहेत. कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाकडे ९ आणि सी-व्हिजिल ॲपवर एकूण ४८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

उमेदवारांच्या प्रचार खर्चाबाबतदेखील स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असून, याबाबत दररोज उमेदवारांच्या खर्चाचा तपशील या कार्यालयाकडे प्राप्त होत असून, त्याचा लेखाजोखा घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा, दक्षता घेत असून मतदानाची पूर्वतयारी करण्यात येत आहे, अशी माहिती कसबा पेठ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.

२९९ ज्येष्ठ करणार टपाली मतदान

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी टपाली मतदानासाठी नोंदणी केलेल्या ८० वर्षांवरील वय असलेले २९९ ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग मतदारांना टपाली मतदान स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष घरी राहून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नमुना १२ ड भरून दिलेल्या ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष घरी राहून मतदान करता येण्याबाबत सुविधा आहे. मतदान अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवून त्यांचे मत नोंदवून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी केली असून, १६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत ही कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी आठ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Kasba Peth By-Election Liquor worth 10 thousand was caught in the kasba election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.