कर्तव्य बजावण्यात कसबा पुढे; सर्वाधिक ३५.६३ टक्के नोंद, पुण्यात पहिल्या ६ तासात २९.०३ टक्के मतदान
By नितीन चौधरी | Updated: November 20, 2024 14:21 IST2024-11-20T14:20:38+5:302024-11-20T14:21:12+5:30
पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान पिंपरी मतदारसंघात २१.३४ टक्के मतदान झाले

कर्तव्य बजावण्यात कसबा पुढे; सर्वाधिक ३५.६३ टक्के नोंद, पुण्यात पहिल्या ६ तासात २९.०३ टक्के मतदान
पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा लागल्याचे चित्र आहे. पहिल्या सहा तासांत अर्थात दुपारी १ पर्यंत जिल्ह्यात २९.०३ टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह दिसून येत असून आंबेगाव मतदारसंघात सर्वाधिक ३५.६३ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान पिंपरी मतदारसंघात २१.३४ टक्के मतदान झाले आहे.
ग्रामीण भागात सकाली मतदारांच्या रांगा नव्हत्या. मात्र, ११ नंतर रांगा दिसून आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश मतदारसंघात चांगले मतदान झाले आहे. तर शहरी मतदारसंघात सुरुवातीला रांगा होत्या. तर त्यानंतर मतदारांनी कार्यालये गाठल्याने मतदानाचा टक्का कमी झाला आहे. शहरात सर्वाधिक २९.०५ खडकवासला या मतदारसंघात झाले आहे. खडकवासला मतदारसंघात काही भाग ग्रामीणचा असल्याने येथे मतदानाचा टक्का जास्त दिसून येत आहे. तर सर्वात कमी २४.१५ टक्के मतदान हडपसर मतदारसंघात झाले आहे.
२१ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते दुपारी १ पर्यंतचे ३ टप्प्यातील मतदान टक्क्यांत
जुन्नर : ५.२९, १८.५७, ३४.५८
आंबेगाव : ५.७९, १६.६९, ३५.६३
खेड आळंदी ४.७१, १६.४०, ३२.०२
शिरूर ४.२७, १६.४४, २८.६६
दौंड ५.८१, १७.२३, ३१.७८
इंदापूर ५.०५, १६.२०, २९.५०
बारामती ६.२०, १८.८१, ३३.७८
पुरंदर ४.२८, १४.४४, २७.३५
भोर ४.५०, १२.८०, ३०.२७
मावळ ६.०७, १७.९२, ३४.१७
चिंचवड ६.८०, १६.९७, २९.३४
पिंपरी ४.०४, ११.४६, २१.३४
भोसरी ६.२१, १६.८३, ३०.४१
वडगाव शेरी ६.३७, १५.४८, २६.६८
शिवाजीनगर ५.२९, १३.२१, २३.४६
कोथरूड ६.५०, १६.०५, २७.६०
खडकवासला ५.४४, १७.०५, २९.०५
पर्वती ६.३०, १५.९१, २७.१९
हडपसर ४.४५, ११.४६, २४.१५
पुणे कॅन्टोन्मेंट ५.५३, १४.१२, २५.४०
कसबा ७.४४, १८.३३, ३१.६७
एकूण ५.५३, १५.६४, २९.०३