Kasba Vidhan Sabha: कसब्यात रासने धंगेकरांपेक्षा श्रीमंत; २ उमेदवार बारावी, तर एक उमेदवार ८ वी पास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:03 PM2024-11-06T15:03:43+5:302024-11-06T15:04:21+5:30
हेमंत रासने तब्बल १८ कोटींचे धनी असून धंगेकर आणि भोकरेंपेक्षा श्रीमंत आहेत, शिक्षणात रासने व भोकरे बारावी, तर धंगेकर आठवी पास
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून, येथील भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर आणि मनसेच्या गणेश भोकरे यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे त्यांनी दिलेल्या शपथपत्रातून स्पष्ट झाले आहे. रासने १८ कोटी ५४ लाख रुपये, तर धंगेकर ८ कोटी ६० लाखांचे धनी आहेत. तर भोकरे यांच्याकडे ३ कोटी ३० लाखांची मालमत्ता आहे. रासने व भोकरे बारावी, तर धंगेकर आठवी पास आहेत.
काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर
- एकूण मालमत्ता ८ कोटी ६० लाख ३३ हजार रुपये (धंगेकर यांच्याकडे रोख रक्कम ९१ हजार ६००, तर पत्नीकडे ७३ हजार २०० रुपये)
कर्ज - धंगेकर - २३ लाख ७३ हजार रुपये
पत्नीच्या नावे - १९ लाख ३ हजार रुपये
व्यवसाय - शेती व सोने-चांदी कारागिरी, बांधकाम
शिक्षण - आठवीपर्यंत
जंगम मालमत्ता - धंगेकर यांच्या नावे ६९ लाख ९६ हजार ४२ रुपये, पत्नीकडे - ७० लाख ५१ रुपये.
स्थावर मालमत्ता - धंगेकर यांच्या नावे - ४ कोटी ५९ लाख ६३ हजार ९५८ रुपये, पत्नीकडे - २ कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपये.
वाहने व दागिने - धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे. तसेच धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे.
- एकूण १२ प्रलंबित खटले.
भाजपचे हेमंत रासने
एकूण मालमत्ता (स्थावर व जंगम) - १८ कोटी ५४ लाख ५१ हजार रुपये.
कर्ज - रासने यांच्या नावावर ९ कोटी ९७ हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावावर १ कोटी ३८ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज आहे. रासने यांच्याकडे रोख रक्कम १ लाख २ हजार ६९१ रुपये असून, पत्नीकडे ४५ हजार ४५८ रुपये रोकड आहे.
उत्पन्न - शेती व व्यवसाय
शिक्षण - बारावीपर्यंत
जंगम मालमत्ता - रासने यांच्या नावे - ७ कोटी १४ लाख ६१ हजार ६७८ रुपये, तर पत्नीकडे ८७ लाख ७७ रुपये.
स्थावर मालमत्ता - रासने यांच्या नावे - ७ कोटी ९८ लाख ६० हजार रुपये, पत्नीकडे २ कोटी ५३ लाख ५३ हजार रुपये.
वाहने व दागिने - रासने यांच्याकडे दोन चारचाकी, दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १८ तोळे सोने आहे.
- रासमे यांच्याकडे शहरात सदनिका तर कोकणात १३ एकर शेती आहे.
- एकूण ३ प्रलंबित खटले
मनसेचे गणेश भोकरे
एकूण मालमत्ता (जंगम व स्थावर) - एकूण ३ कोटी ३० लाख ७६ हजार रुपये
कर्ज - १ कोटी ३१ लाख ७९ हजार रुपये
राेख रक्कम - ७० हजार ५०० रुपये, पत्नीकडे २५ हजरा ७०० रुपये
एकूण जंगम मालमत्ता - १ कोटी २९ लाख ३६ हजार ४६२, पत्नीकडे ५५ लाख ६९ हजार १६७ रुपये.
कर्ज - १ कोटी ३१ लाख ७९ हजारे.
वाहने - दोन दुकाने व दोन सदनिका (एकूण किंमत १ कोटी ४५ लाख ७१ हजार रुपये), दोन चारचाकी व एक दुचाकी. तसेच त्यांच्याकडे ७ लाख २० हजारांचे सोने, तर पत्नीकडे १८ लाख ५९ हजार ८३२ रुपयांचे सोने आहे.
गुन्हे - पाणीप्रश्नी आंदोलन केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.
शिक्षण - बारावीपर्यंत झाले आहे.