कसबा सर्वात जास्त तर कोथरूड सर्वात कमी! लोकशाहीचा उत्सव पार पडला; पुणेकरांनी खासदार ठरवला
By राजू हिंगे | Published: May 14, 2024 10:27 AM2024-05-14T10:27:45+5:302024-05-14T10:28:17+5:30
रवींद्र धंगेकर आमदार असणाऱ्या कसब्यात सर्वाधिक मतदान तर मुरलीधर मोहोळ यांचा बालेकिल्ला कोथरूडमध्ये सर्वात कमी मतदान
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. या मतदार संघात ५१.२५ टक्के मतदान झाले असून गेल्या निवडणुकीपेक्षा १.३१ टक्के वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फटका कोणाला बसतो याची उत्सुकता लागली आहे या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वात जास्त मतदान कसबा तर सर्वात कमी मतदान कोथरुड मतदारसंघात झाले आहे. कोथरूड मध्ये टक्केवारीने मतदान कमी असले तरीही मतदारांची संख्या जास्त आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके यांच्यात लढत झाली. या जागेेसाठी आज मतदान झाले. पुणे लोकसभा मतदारसंघात २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यात सर्वाधिक मतदान वडगावशेरी मतदारसंघात आहे. पुणे लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत ४९.८७ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५५्.८८ टक्के तर सर्वात कमी मतदान म्हणजे ४६.४१ टक्के वडगावशेरी मतदारसंघात झाले होते. यंदा ही सहाही विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान कसबा मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कोथरुड मतदारसंघात झाले आहे. कोथरूड मतदार संघात टक्केवारीने मतदान कमी झाले असले तरी मतदारांची संख्या जास्त आहे. कोथरूडमध्ये कमी झालेले मतदान आणि वडगावशेरीमध्ये वाढलेले मतदान कुणाच्या पथ्थावर पडणार यावर बरेच काही अवलबुन आहे.
शेवटच्या एका तासात शिवाजीनगर मध्ये वाढले ११ टक्के मतदान
पुणे लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यत ३३.०७ टक्के मतदान झाले होते. तीन नंतर मतदार मोठया प्रमाणात बाहेर पडले. त्यामूळे दुपारी चार नंतर काही मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे दुपारी तीन ते सायकांळी सहा वाजेपर्यत तीन तासात म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यत सुमारे ५१.२५ टक्के मतदान झाले. शेवटच्या तीन तासात १८.१८ टक्के मतदान झाले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ शेवटच्या एका तासात ११ टक्के मतदान झाले आहे. कोथरूड मतदारसंघात अपेक्षेपेक्षा कमी मतदानपुणे लोकसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात ४९.१०टकके मतदान झाले आहे. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ५०.२६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी
विधानसभा मतदारसंघ २०१९ २०२४
कसबा ५५.८८ ५७.९०
शिवाजीनगर ४६.९४ ४९.७२
कोथरूड ५०.२६ ४९. .१०
पुणे कॅन्टोन्मेंट ४९.८२ ५०.५२
पर्वती ५२.०४ ५२.४३
वडगावशेरी ४६.४१ ४९.७१