कसबा भाजपचा बालेकिल्ला राहीलच, पुण्येश्वर मंदिराला काँग्रेस पाठिंबा देणार का?- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 09:39 AM2023-02-25T09:39:01+5:302023-02-25T09:39:38+5:30

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले....

Kasba will remain BJP's stronghold, will Congress support Punyeshwar Temple? - Devendra Fadnavis | कसबा भाजपचा बालेकिल्ला राहीलच, पुण्येश्वर मंदिराला काँग्रेस पाठिंबा देणार का?- देवेंद्र फडणवीस

कसबा भाजपचा बालेकिल्ला राहीलच, पुण्येश्वर मंदिराला काँग्रेस पाठिंबा देणार का?- देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

पुणे : कसब्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवाराला साथ द्या. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असून, तो कायम राहिलाच पाहिजे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सगळ्या समाजांना एकत्रित घेऊन विकासाचा रथ पुढे घेऊन जायचा आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, शहरात मेट्रोचे नेटवर्क, नदी स्वच्छता व सुशोभिकरण प्रकल्पामुळे पुण्याचा चेहरा बदलणार आहे. देशामध्ये सर्वाधिक ई-बसेस पुण्यामध्ये पीएमपीएलसाठी आल्या असल्याने केंद्र सरकारकडून या मॉडेलचे कौतुक केले जात आहे. शहरात रिंगरोड, विमानतळाचा विस्तार ही कामे केली जात आहेत. विकासातून परिवर्तन घडवताना कसब्यात भाजपचा आमदार हवा आहे. पेठांमधील वाड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी हेमंत रासने आणि शैलेश टिळक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असून, वाड्यांच्या विकासातील अडथळे, नियमांचे बंधन हटवून पुनर्विकासाचा मार्ग खुला करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर वाड्यांच्या पुनर्वसनाबाबतचे आदेश काढले जाणार आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेत ही निवडणूक आता राष्ट्रीय विचारांची वैचारिक लढाई झाली आहे. ही निवडणूक आता हिंदुत्ववादी विचारांची असल्याचे सांगत, केंद्रात भाजपचे सरकार असून, राज्यात भाजप-शिवसेना सरकार आहे. त्यामुळे कसब्याच्या सर्वांगीण विकासासाठी कसब्यातही भाजपच्या उमेदवाराला साथ द्यावी, असे फडणवीस यांनी सांगितले.

पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराला काॅंग्रेस पाठिंबा देणार का ?

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही निवडणूक लागल्याने त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी रासने निवडणुकीत उभे आहेत. गिरीश बापट यांनी आजारी असूनही मतदारांना केलेल्या आवाहनावर आपण ही निवडणूक नक्कीच जिंकू. पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराला धंगेकर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देणार का? असा प्रश्न फडणवीस यांनी केला.

Web Title: Kasba will remain BJP's stronghold, will Congress support Punyeshwar Temple? - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.