क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कटारिया
By admin | Published: April 1, 2017 02:31 AM2017-04-01T02:31:28+5:302017-04-01T02:32:19+5:30
क्रेडाई, महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी शांतिलाल कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली
पुणे : क्रेडाई, महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी शांतिलाल कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २ वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड केली आहे.
राजीव पारीख (कोल्हापूर), प्रमोद खैरनार पाटील (औरंगाबाद), महेश साधवानी (नागपूर), रसिक चौव्हाण (नवी मुंबई) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुनील कोतवाल (नाशिक) यांची सचिवपदी व अनुज भंडारी (पुणे) यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली.
पुणे शहरातून राज्यस्तरीय सल्लागार समिती अध्यक्षपदी सुहास मर्चंट, आदित्य जावडेकर (संयोजक युवा विभाग), दर्शना परमार-जैन (संयोजक महिला विभाग), आय. पी. इनामदार (कायदा समिती), आश्विन त्रिमल (महसूल समिती), अखिल अगरवाल (रेरा समिती) व याव्यतिरिक्त इतर २४ सदस्यांचा महाराष्ट्रातून आपल्या कार्यकारी समितीमध्ये समावेश केला आहे.
के्रडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी परांजपे
क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी श्रीकांत परांजपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या उपाध्यक्षपदी २०१७ ते २०१९ या कार्यकाळासाठी रोहित गेरा, सुहास मर्चंट, अनिल फरांदे, किशोर पाटे (वाणी), अमर मांजरेकर, मनीष जैन यांची निवड झाली आहे. रणजित नाईकनवरे यांची मानद सचिवपदी, अनुज भंडारी यांची मानद खजिनदारपदी व अतुल गोयल यांची मानद सहसचिवपदी निवड करण्यात आली.