रविवारी कोथरूडमध्ये होणार धमाल

By admin | Published: June 2, 2017 02:46 AM2017-06-02T02:46:51+5:302017-06-02T02:46:51+5:30

आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना न्यू डीपी रोड

Kathrud will be held in Kathurud on Sunday | रविवारी कोथरूडमध्ये होणार धमाल

रविवारी कोथरूडमध्ये होणार धमाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना न्यू डीपी रोड, महेश विद्यालयासमोर, कोथरूड, येथे रविवार, दि. ४ जून व ११ जून सकाळी ७ ते ९.३० या वेळेत आपल्याला धमाल करण्याची संधी मिळणार आहे. मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात फक्त मनोरंजन होणार नाही तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल. प्रायोजक मॅपल ग्रुप व हिरो ड्युएट, डिजीटल पार्टनर : जीओ, को पार्टनर : श्रद्धा अलायन्स, सोशल पार्टनर : रोटरी क्लब आॅफ लोकमान्यनगर, सेफ्टी पार्टनर : एम बाउंसर, आउटडोअर पार्टनर : सुरेखा अ‍ॅडव्हायझिंग, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, सहयोगी प्रायोजक - सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर - एच. पी. ज्वेलर्स, किड्स पार्टनर- किडझी (कर्वेनगर), कार केअर पार्टनर - डिमायटो यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडणार आहे.

‘लोकमत धमाल गल्ली’त रविवारी होणारे खेळ व उपक्रम


 सायकलिंग
  स्केटिंग
  फ्लॅश मॉब
  रस्सीखेच
 आर्ट्स/क्राफ्ट्स
  योगा
  बॅडमिंटन
  झुंबा
  बॉलिवूड डान्स
  बॉक्स क्रिकेट


  बँड परफॉर्मन्स
  पुणेरी पगडी कॉर्नर
  अँग्री बर्ड्स
 स्नेक्स अ‍ॅण्ड लॅडर्स
  कीड्स कॉर्नर
  टॅटू
  ड्रॉर्इंग
 फेस पेंटिंग
  फुटबॉल
  फोटो बुथ-इन्स्टंट फोटो
  जेंबे

या कार्यक्रमात पाच भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. लोकप्रिय डान्सचा प्रकार असून, तरुणाईला एन्जॉय करता येणार आहे. पूर्वी सायकलीचे असलेले पुणे शहर आता दुचाकीचे बनले आहे. त्यामुळे सायकल चालवून आपली पूर्वीची ओळख पुन्हा मिळविण्याचा धमाल गल्लीचा प्रयत्न या वर्षीही असणार आहे. पुणेरी पगडी घालण्याची संधी मिळणार आहे.

मोकळ्या रस्त्यावर स्केटिंगच्या थ्रिलची मजा अनुभविण्याची संधी मिळणार आहे. भर रस्त्यावर उभे राहून बॅडमिंडनचे रॅकेट हातात घेऊन खेळण्याची संधी मिळणार आहे. टॅटू-नेलपेंट-मेंदी रंगण्याची संधी मुलींच्या नखावर नक्षीकामाचा आनंद घेता येणार आहे, असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात सेल्फी काढून फेसबुकवर #ऊँेंं’ॠं’’्र ला टॅग करा. त्यातील निवडक सेल्फींना ‘लोकमत’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल.

महेश मांजरेकर, आकाश ठोसर व एफयूची संपूर्ण टीम तुमच्याशी फ्रेंडशिप करायला येत आहे कोथरूडच्या धम्माल गल्लीत. याच दिवशी धम्माल गल्लीत टीम इंडियाला सपोर्ट करणाऱ्या गेटअपमध्ये सहभागी व्हा आणि मिळवा ‘मौका’ अनेक बक्षिसे जिंकण्याचा.

लोकमत धम्माल गल्ली कॉन्टेस्टमध्ये सहभागी व्हा आणि मिळवा आकाश ठोसरला भेटण्याची संधी. त्यासाठी 9860564526 यावर खाली दिलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर दि. ३ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवा.
१) आकाश ठोसरचे एफयूमधील नाव काय?
२) सैराटमधील आकाश ठोसर खेळत असलेल्या
क्रिकेट लीगचे नाव काय?
३) वाँटेड चित्रपटात महेश मांजरेकर यांची
भूमिका असलेले नाव काय?
* नियम व अटी लागू

Web Title: Kathrud will be held in Kathurud on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.