कात्रज ते सारोळा पीएमपीएमएल बस सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:28 AM2020-12-13T04:28:01+5:302020-12-13T04:28:01+5:30
नसरापूर : सारोळा (ता.भोर) ते कात्रज (पुणे) सातारा महामार्गावर पीएमपीएमएल (रूट क्रमांक ६१) आज सारोळा ...
नसरापूर : सारोळा (ता.भोर) ते कात्रज (पुणे) सातारा महामार्गावर पीएमपीएमएल (रूट क्रमांक ६१) आज सारोळा परिसरातील ग्रामस्थांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. विद्यार्थी, ग्रामस्थ शुरवीर मावळी संघटना आणि भोर वेल्हा घाटमाथा बस संघटनेने बस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व त्यालगत असणाऱ्या उपनगरातील दैनंदिन व्यवहार खाजगी, व्यावसायिक दुकाने, औद्योगिक कंपन्या, सरकारी कार्यालये, लघु उद्योग सुरू झाल्यामुळे प्रवासी व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार परिवहन महामंडळाची मर्यादीत बससेवा आज सुरू करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षापासून स्वारगेट ते सारोळा बससेवा सुरु करण्यासाठी नागरिकांची मागणी प्रलंबीत होती. पीमपीएमएलने आज बस सेवा सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर केली आहे.७० रूपये मध्ये दिवसभराचा पास तर जेष्ठ नागरिक यांना ४० रूपयांचा पास मिळाल्याने तसेच विद्यार्थी , कामगार व ग्रामस्थांनी यांनी यावेळी आंनद व्यक्त केला.
यावेळी सारोळा (ता.भोर) ते कात्रज (पुणे) बस शुभारंभसाठी भांबवडे सरपंच विजय गरूड, सारोळा सरपंच दिपाली धाडवेपाटील , रूपेश धाडवेपाटील, नानासाहेब धाडवेपाटील, पीएमपीएमएल कात्रज डेपोचे व्यवस्थापक विजय रांजणे, कात्रज घाटमाथा संघटना अध्यक्ष उत्तम मोरे, आप्पा मोरे, विलास मांगडे, चंद्रकांत घोलप, गुलाब शिंदे, संतोष सुतार, सुनिल वालगुडे , विजय भरगुडे ,आंनदा इंगुळकर , सचिन देवघरे ,दादा लोहमकर, शेखर यादव (वाहक ) निलेश खोपडे (चालक )आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
फोटो : पुणे सातारा महामार्गावर सारोळा (ता.भोर) ते कात्रज आज पीएमपीएमएलची बस सेवा सुरू करण्यात आली.