कात्रज हे विकासकामाचे मॉडेल

By admin | Published: December 22, 2016 02:26 AM2016-12-22T02:26:23+5:302016-12-22T02:26:23+5:30

ज्या लोकप्रतिनिधींना विकास म्हणजे काय किंवा आपल्या भागाचा विकास कसा करायचा, हे माहीत नसेल तर त्यांनी कात्रज भागात

Katrraj is the development model | कात्रज हे विकासकामाचे मॉडेल

कात्रज हे विकासकामाचे मॉडेल

Next

बिबवेवाडी : ज्या लोकप्रतिनिधींना विकास म्हणजे काय किंवा आपल्या भागाचा विकास कसा करायचा, हे माहीत नसेल तर त्यांनी कात्रज भागात येऊन पाहावे. कात्रज हे विकासकामाचे मॉडेल आहे, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून कात्रज येथील मनपाच्या कृष्णाजी बलवंतराव मोरे विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्याचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रभाग क्रंमाक ७६ मधील मोरया गार्डन, ओपन जिमचे उद्घाटन, तसेच कात्रज तलावावर असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला करण्यात आलेली रोषणाई, पाटीलवाडा, विठ्ठलमूर्ती येथील रोषणाई, कात्रज फुलराणीसाठी नव्याने बनवण्यात येत असलेला बोगदा याचेदेखील उद्घाटन या वेळी झाले. वसंत मोरे यांनी सांगितले, की कात्रज भागाचा झालेला विकास हा मी पाहिलेल्या विकासाच्या स्वप्नापेक्षा अजून फक्त ५० टक्केच झालेला आहे. यापुढील काळात राहिलेली कामे मार्गी लावली
जातील.
या वेळी विकास फाटे, योगेश खैरे, मंगेश रासकर, शंकुतला मोरे, सारिका फाटे, तनुजा रासकर, नितीन जगताप, बाळासाहेब फाटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Katrraj is the development model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.