पुणे लघुपट महोत्सवात ‘कावळा उड’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:34+5:302020-12-08T04:10:34+5:30
पुणे : दहाव्या पुणे लघुपट महोत्सवात आशुतोष जरे दिग्दर्शित ‘कावळा उड’ लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर ‘सायलेंट टाईज’ ...
पुणे : दहाव्या पुणे लघुपट महोत्सवात आशुतोष जरे दिग्दर्शित ‘कावळा उड’ लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर ‘सायलेंट टाईज’ लघुपटासाठी सई देवधर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.
मराठी चित्रपट परिवारातर्फे आयेजित महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ समीक्षक दिलीप कुकडे आणि ज्येष्ठ कॅमेरामन राम झोंड यांच्या हस्ते झाले. ‘मिश्टी दोई’ लघुपटासाठी शिबु साबळे यांना दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक मिळाले तर ‘सायलेंट टाईज’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारितोषिक मिळाले.
‘अ सायलेंट व्हर्बल’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट संकलन सह सर्वोत्कृष्ट स्टुडंट लघुपटाचे पारितोषिक पटकाविले. सर्वोत्कृष्ट जाहिरातीचे पारितोषिक ‘युएसएलपी शॉवर’ लघुपटाला तर ’ह्यूज इज द विमेन्स डे फॉर’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचे पारितोषिक मिळाले. केरळमधील ‘मारवैरी’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट सांगीतिक लघुपटाचे पारितोषिक मिळाले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारिताषिक शरद जाधव यांनी ‘एक एमआर की मौत’ या लघुपटातील अभिनयासाठी पटकाविले तर वीणा जामकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ‘कावळा उड’ साठी पारितोषिक मिळाले. ‘कुंभिल शिवा’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि पटकथचे पारितोषिक मिळाविले. ‘गर्ल’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट संंकल्पनेचे पारितोषिक मिळाविले तर दुर्गा आजगांवकर यांच्या ‘दि ईटरनल फ्लो’ लघुपटाने बेस्ट नॅरेटिव्ह लघुपटाचे पारितोषिक मिळविले. ज्येष्ठ निर्मात्या मार्था बेकर, सारथी निरंजन आणि मायकेल सिव्हेला यांनी परीक्षण केले.