कवठे यमाईला चंदन जप्त; एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:17+5:302021-02-16T04:11:17+5:30
टाकळी हाजी : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील पोळवस्ती येते चंदनाच्या झाडाची चोरी करून घेऊन जाणाऱ्या एकाला ...
टाकळी हाजी : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील पोळवस्ती येते चंदनाच्या झाडाची चोरी करून घेऊन जाणाऱ्या एकाला शिरूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे २ लाख १० हजार रुपये किमतीचा चंदनाची लाकडे सापडली.
श्रीकांत भीमा भोसले (रा. शिरूर, ता. शिरूर) याला चंदनाच्या लाकडासह अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांना यांना कवठे यमाई गावच्या हद्दीत पोळवस्ती येथे काही लोक चंदनाच्या लाकडाची चोरी करत असून चोरलेले लाकूड गोणीमध्ये भरून ठेवलेले आहेत, अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिलाली. त्यांनी ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक बिरूदेव काबुगडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार संतोष साठे, पोलीस नाईक संजू जाधव, पोलीस नाईक अनिल आगलावे, पोलीस अंमलदार करणसिंग जारवाल, पोलीस अंमलदार संतोष साळुंखे, प्रशांत खुटेमाटे, प्रवीण पिठले यांच्या पथकासह खासगी वाहनाने कवठे येमाई येथील पोळ वस्ती येथे पोहोचले या ठिकाणी त्यांनी सापळ रचला. सपकाळ यांच्या घर शेजारी पालाच्या झोपड्या दिसल्या. पोलिस तेथे पोहोचताच त्या ठिकाणी एक जण दुचाकीवरून दोरीने बांधलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोणीत काहीतरी घेऊन आल्याचे दिसले पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याच्या गोण्या उघडून पाहिले असता चंदनाची सुगंधीत लाकूड आढळून आले.
त्याची किंमत २ लाख १० हजार एवढी असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट :
शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चंदनाची व इतर वृक्षांची तस्करी होत आहे. वन विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याने मोठ्या प्रमाणातील वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे. तालुक्यातील झाडांची कत्तल करून रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र लक्ष्मी कृपा घेऊन वन विभाग लाकूड चोरांना आशीर्वाद देत असल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.