केंजळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता अजय बाठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:10 AM2021-02-12T04:10:48+5:302021-02-12T04:10:48+5:30
भोर तालुक्यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्वाची असलेली केंजळ ग्रामपंचायत निवडणुकीत ९ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने जिंकुन सलग चौथ्यांदा ग्रामपंचायतीवरती माजी ...
भोर तालुक्यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्वाची असलेली केंजळ ग्रामपंचायत निवडणुकीत ९ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने जिंकुन सलग चौथ्यांदा ग्रामपंचायतीवरती माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या गटाने बाजी मारली होती आणी केंजळ ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात राखली आहे. सरपंचपदाच्या निवडणुक बिनविरोध करुन परंपरा कायम ठेवली आहे. निवडणुक आधिकारी म्हणून राठोड यांनी काम पाहिले.
माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखाली काळ भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने ही निवडणूक लढवली होती. निवडणुकीत राकेश तुळशीदास बाठे, किरण मारुती येवले उत्तम किसन शेटे, कविता अजय बाठे, अंजुषा रोहिदास येवले, सविता आनंदा बाठे, सुवर्णा महादेव काळे हे उमेदवार बहुमताने विजयी झाले.
किरण सोमनाथ जाधव शीतल उमाकांत राऊत या उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित लढवली होती एकूण ९ जागांपैकी ६ जागांवर राष्ट्रवादीने तर ३ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या आणी चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आपले वर्चस्व मागील २० वर्षांत पासुन सत्ता कायम राखण्यात यश आले आहे
माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या माध्यमातून केंजळ ग्रामपंचायतीने गावात आदर्श प्राथमिक शाळा सौरऊर्जा प्रकल्प या शिवाय गावातील विविध विकासकामे केली आहेत. पुढील काळात विकासकामे केली जातील, असे सरपंच कविता बाठे यांनी सांगितले.
--
फोटो ११ भोर केंजळे सरपंच बोठे
फोटो केंजळे (ता. भोर) येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांच्यासह माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे.