काव्या, नील, श्रावणी, अर्जुन यांना विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:13 AM2021-02-26T04:13:53+5:302021-02-26T04:13:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आणि केपीआयटी यांच्या संलग्नतेने १२ व १४ वर्षांखालील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आणि केपीआयटी यांच्या संलग्नतेने १२ व १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलांच्या गटात नील केळकर व अर्जुन किर्तने यांनी, तर मुलींच्या गटात काव्या देशमुख व श्रावणी देशमुख यांनी विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस म्हाळुंगे-बालेवाडीत ही स्पर्धा झाली. चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित अर्जुन किर्तनेने चिराग चौधरीचा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत श्रावणी देशमुख हिने चौथ्या मानांकित मृणाल शेळकेचा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
बारा वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत नील केळकर याने वैष्णव रानवडेचा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात अव्वल मानांकित काव्या देशमुख हिने दुसऱ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीचा एकतर्फी पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रणव वाघमारे आणि स्पर्धा निरीक्षक रेशम रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.
चौकट
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
१२ वर्षांखालील मुली : उपांत्य फेरी :
काव्या देशमुख (१) वि.वि.रिशीता पाटील (४) ७-५;
सृष्टी सूर्यवंशी (२) वि.वि. ध्रुवा माने (३) ७-६ (२);
अंतिम फेरी : काव्या देशमुख (१) वि.वि. सृष्टी सूर्यवंशी (२) ४-१, ४-१;
१२ वर्षांखालील मुले : उपांत्य फेरी :
वैष्णव रानवडे वि.वि. स्मित उंडरे ७-०;
नील केळकर वि.वि. क्रिशांक जोशी (२) ७-४;
अंतिम फेरी : नील केळकर वि.वि. वैष्णव रानवडे ५-३, ४-१;
१४ वर्षाखालील मुली : उपांत्य फेरी :
श्रावणी देशमुख वि.वि. निशिता देसाई (३) ७-०;
क्षिरीन वाकलकर (२) वि.वि. मृणाल शेळके (४) ७-२;
अंतिम फेरी : श्रावणी देशमुख वि.वि. मृणाल शेळके (४) ४-२, ४-२;
१४ वर्षांखालील मुले : उपांत्य फेरी:
अर्जुन किर्तने (४) वि.वि. अंकित राय ७-१;
चिराग चौधरी वि.वि. दक्ष पाटील ७-३;
अंतिम फेरी : अर्जुन किर्तने (४) वि.वि. चिराग चौधरी ५-३, ५-४ (२).