केडगावला कांद्याला राज्यातील उच्चांकी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:41+5:302021-05-24T04:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : दौड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडागाव येथे कांद्याला प्रतिक्विंटल २२०० रुपये उच्चांकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : दौड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडागाव येथे कांद्याला प्रतिक्विंटल २२०० रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला असल्याची माहिती कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान आटोळे, उपसभापती राजू जगताप, सचिव मोहन काटे यांनी दिली. लॉकडाऊन काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव मिळण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असल्याचा दावा दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीने केला आहे.
केडगाव येथील उपबाजारात रविवारी कांद्याच्या सोळाशे गोण्यांची आवक झाली. एकूण ८११ क्विंटल कांदा बाजारात विक्रीस आला. त्यात चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले. वादळ, वारे आणि पावसाची परिस्थिती पाहता गेल्या मंगळवारी केडगावच्या उपबाजारात कांद्याची आवक घटली होती. यावेळी कांद्याला प्रतिक्विंटलला तेराशे रुपये भाव मिळाला. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यात नाराजीचा सूर होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत वादळ , वारे , पाऊस थांबल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. बाजारभाव प्रतिक्विंटलला बावीसशे रुपये निघाला. या तुलनेत
जुन्नर, ओतूर येथे कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार एक रुपये बाजारभाव मिळाला.