‘पुण्यदशम’ने प्रवास करताना ओळखपत्र जवळ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:50+5:302021-07-17T04:10:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीने केवळ दहा रुपयांत शहरांतील ९ मार्गांवर पुण्यदशमची सेवा सुरू केली. मात्र पुण्यदशमच्या बसमधून ...

Keep the identity card with you while traveling on ‘Punyadasham’ | ‘पुण्यदशम’ने प्रवास करताना ओळखपत्र जवळ ठेवा

‘पुण्यदशम’ने प्रवास करताना ओळखपत्र जवळ ठेवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीएमपीने केवळ दहा रुपयांत शहरांतील ९ मार्गांवर पुण्यदशमची सेवा सुरू केली. मात्र पुण्यदशमच्या बसमधून प्रवास करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य केले. ज्याच्याकडे ओळखपत्र नाही ती व्यक्ती प्रवास करू शकत नाही. या नियमामुळे अनेक प्रवासी या सेवेपासून वंचित राहत आहेत. तर काहीचे वाहकांसोबत वाद देखील होत आहेत. तेव्हा पुण्यदशमच्या बससेवेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्रची सक्ती नको, तसेच पासला पर्याय म्हणून साधे तिकीट देखील मिळावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

''पुण्यदशम ''च्या प्रवाशांना १० रुपयांत दिवस भर प्रवास करण्याचा पास दिला जातो. ते देत असताना ओळख पत्रावरील शेवटच्या ४ आकडी क्रमांक पासवर टाकण्यात येतो. जेणेकरून ह्या तिकिटाचा गैरवापर होऊ नये. मात्र अनेक प्रवाशांकडे ओळखपत्रे नाहीत. वाहक बसमध्ये प्रवेश करतानाच विचारतो पॅनकार्ड, आधारकार्ड असेल तरच प्रवेश देणार आहेत. प्रवाशांनी ओळखपत्राची सक्ती नको, अशी भावना मांडली आहे.

९ जुलै रोजी सुरू झालेल्या ह्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. आता ५० बसमधून रोज जवळपास २० हजार प्रवासी प्रवास करीत आहे.

------------------------

गाडी वातानुकूलित अन् खिडक्या उघड्या :

पुण्यदशम ही बस वातानुकूलित आहे. त्यामुळे त्याच्या काचेच्या खिडक्या इ बसप्रमाणे बंदिस्त असणे गरजेचे होते. मात्र या बसमध्ये सरकविण्याचे आहे. अनेक प्रवासी खिडक्या उघडेच ठेवतात, तर दुसरीकडे वातानुकूलित यंत्रणा सुरूच असते. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा लवकर बिघडण्याची शक्यता आहे.

-------------------------------

काय म्हणताहेत प्रवासी :

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना दोन पर्याय उपलब्ध करून घ्यावेत. ज्यांना दिवसभर प्रवास करायचे आहे. त्यांनी पास काढून दिवसभर प्रवास करावा. ज्यांना केवळ एकदा प्रवास करायचा आहे. त्यांना साधे तिकीट दिले जावे. प्रवाशांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडतील.

अजित चौपडे, प्रवासी

-----------------------

दहा रुपयांत वातानुकूलित बसमधून प्रवास ही योजना छान आहे. मात्र अनेकांकडे ओळखपत्र नसतात. त्याची अडचण येऊ शकते. तेव्हा या बाबीचादेखील विचार झाला पाहिजे.

अनुराधा कदम, प्रवासी

-----------------------

पीएमपीकडून देण्यात येणारे तिकीट हे हस्तांतर करता येत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीने तिकीट काढले. त्यांनीच प्रवास करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे. तिकिटाचा दुरुपयोग होऊ नये, हा हेतू आहे.

डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे

Web Title: Keep the identity card with you while traveling on ‘Punyadasham’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.