सिंचन कार्यालयाला ठोकले टाळे
By admin | Published: November 23, 2015 12:36 AM2015-11-23T00:36:44+5:302015-11-23T00:36:44+5:30
खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून उजनीसाठी पाणी सोडण्याच्या निषेधार्थ भामा खोऱ्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती
चाकण : खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून उजनीसाठी पाणी सोडण्याच्या निषेधार्थ भामा खोऱ्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व भाजपाचे नेते शरद बुट्टे पाटील यांचे नेतृत्वाखाली आज सकाळी भामा-आसखेड धरणाचे सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे सहायक अभियंता गणेश हासे यांचे करंजविहिरे येथील कार्यालयाला टाळे ठोकले आणि धरणावर जाऊन आंदोलन केले.
शेकडो शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी (दि. २२) निदर्शने करीत धरणाचे धरणस्थळी जाऊन आंदोलन केले. भामा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या त्यागातून धरणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे धरणाचे पाणी मिळण्याचा हक्क असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. या वेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करून भूमिका स्पष्ट केली.(वार्ताहर)