किमान महापालिकेच्या बोधचिन्हाची तरी आठवण ठेवा.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:58 PM2018-12-05T12:58:10+5:302018-12-05T13:03:27+5:30

आग्र्याहून हून सुटका करून घेऊन शिवाजी महाराज राजगडावर परतले तो दिवस राजगड स्मारक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे साजरा करण्यात येत असतो.

Keep in mind the symbolic statue of pmc ... | किमान महापालिकेच्या बोधचिन्हाची तरी आठवण ठेवा.....

किमान महापालिकेच्या बोधचिन्हाची तरी आठवण ठेवा.....

googlenewsNext
ठळक मुद्देआग्र्याहून सुटका स्मृतीदिन: निधी देण्याची विरोधकांची मागणीमहापौर मुक्ता टिळक यांना निधी त्वरीत सुरू करावी अशी मागणी करणारे पत्र महाराजांच्या जीवनातील या प्रसंगाची प्रेरणा रहावी हा उद्देश

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुनर्जन्मच असणाऱ्या आग्र्याहून सुटका स्मृतीदिनाला (दि. १६ डिसेंबर) निधी नाकारणाऱ्या प्रशासनाने किमान महापालिकेच्या बोधचिन्हाची तरी आठवण ठेवावी असे खेदजनक उद्गार हा दिवस गेली ४० वर्ष सलगपणे साजरा करणाऱ्या राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक वसंतराव प्रसादे यांनी काढले. महापालिकेतील विरोधकांनीही हा निधी त्वरीत सुरू करावी अशी मागणी करणारे पत्र मंगळवारी महापौर मुक्ता टिळक यांना दिले.
आग्र्याहून हून सुटका करून घेऊन शिवाजी महाराज राजगडावर परतले तो दिवस राजगड स्मारक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे साजरा करण्यात येत असतो. महाराजांच्या जीवनातील या प्रसंगाची प्रेरणा रहावी हा उद्देश त्यामागे आहे. त्यासाठी महापालिकेने अगदी सुरूवातीला ३० हजार रूपये निधी दिला होता. तो गेल्या दोन वर्षांपर्यंत वाढून २ लाख रूपये झाला. त्यानंतर मात्र आता उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेत महापालिकेने हा निधी देणे नाकारले आहे. मागील वर्षी व याहीवर्षी हा निधी मंडळाला मिळालेला नाही. यासंबधीचे वृत्त ‘लोकमत’ ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केला आहे. 
त्यावर बोलताना प्रसादे म्हणाले, ‘‘कोणते न्यायालय महाराजांच्या जीवनातील या अत्युच्च पराक्रमाचे स्मरण करण्यासाठीचा निधी नाकारेल. मात्र आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. आम्ही काही कोट्यवधी रूपये मागत नाही. मंडळाकडे स्वत:चा असा काहीही निधी नाही. वर्गणी काढून उत्सव साजरा करण्यात येतो. त्यालाही आता मर्यादा येत आहेत, म्हणून महापालिकेची मदत हवी आहे. निधी नाकारणाºयांनी पालिकेच्या बोधचिन्हात असलेल्या अश्वारूढ महाराजांचे तरी स्मरण करायला हवे होते. निधी नाही म्हणून आम्ही उत्सव थांबवला नाही, तो होतच आहे व होतच राहणार, मात्र त्यात महापालिकेचा काहीही सहभाग नाही ही खंत वाटणारी गोष्ट आहे.’’
महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे, शिवसेनेचे संजय भोसले, बाळा ओसवाल आदींनीही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. मोरे, शिंदे यांनी महापौरांना लेखी पत्र देत या निधीबाबत त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा, यातून महापालिकेबाबत शिवप्रेमींमध्ये नाराजी निर्माण होत आहे अशी भावना व्यक्त केली.  
.................
निधी न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पदाधिकाऱ्यांचा त्यात काहीच सहभाग नाही. प्रशासनाबरोबर चर्चा करून, तसेच विधी अधिकाºयांचा सल्ला घेऊन याबाबत नक्की निर्णय घेण्यात येईल. निधी नाकारणे अयोग्य आहे असेच आमचेही मत आहे.
मुक्ता टिळक, महापौर,
-------------------
सत्ताधारी, विरोधक असे यात काहीही नाही. न्यायालयाच्या एका आदेशाचा अर्थ लावून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीने यातून काय मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न करू. निधीअभावी उत्सव थांबणार नाही याची काळजी घेऊ
श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते,

Web Title: Keep in mind the symbolic statue of pmc ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.