आमचा सन्मान राखा आम्ही सभापतिपद सन्मानाने परत देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:35+5:302021-02-24T04:10:35+5:30
पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याचा आरोप झाला होता. यामुळे पक्षाकडून कारवाईचे पत्र देण्यात आले आहे. त्यासाठी भोर पंचायत ...
पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याचा आरोप झाला होता. यामुळे पक्षाकडून कारवाईचे पत्र देण्यात आले आहे. त्यासाठी भोर पंचायत समितीच्या सभापती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वरील भूमिका सभापती दमयंती जाधव यांनी मांडली. यावेळी माजी सभापती श्रीधर किंद्रे, स्वप्निल जाधव उपस्थित होते. दमयंती जाधव म्हणाल्या २०१७ साली सभापतिपद सर्वसाधरण महिलेसाठी होते. सभापतिपद दोन्ही महिलांना सव्वा-सव्वा वर्ष देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, मंगल बोडके सभापती झाल्यावर त्यांनी सव्वा वर्षानी राजीनामा दिलाच नाही. त्या वेळी लहू शेलार यांनी आम्हाला मदत करण्याऐवजी बोडके यांचे सर्मथन केले. त्यामुळे मला सभापतिपद मिळालेच नाही. त्यावेळी माझ्यावर अन्याय झाला तरीही मी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. पक्षात राहून काम केले. मात्र, त्या वेळी पक्षाने मंगल बोडकेसह कुणावरही कारवाई केली नाही. मग आमच्यावरच कारवाइचा दबाव का? आम्ही चुकीचे असतो तर मला सर्वच्या सर्व सहा मते मिळाली नसती.
मी सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचीच असून पक्षाच्या विरोधात नाही. आम्हाला सन्मान द्या. सहा महिन्याने राजीनामा देऊन सन्मानाने पंचायत समितीचे सभापतिपद, देऊ असेही दमयंती जाधव म्हणाल्या.
कोट
सभापतिपदाचा राजीनामा घेण्याआधी सर्वांना एकत्र करून सभापतीपदाबाबत काय निर्णय घेणार आहात, याची बैठक घेऊन माहिती देणे गरजेचे होते. मात्र, पक्षाने काहीच सांगितले नाही. आम्ही पक्षाबरोबरच आहोत शिवसेनेने सभापतिपदासाठी अर्ज भरल्याने सभापती इतर पक्षाचा होऊ नये म्हणून आम्ही दमयंती जाधव यांचा अर्ज भरला आणि त्यांना सहाच्या सहा मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीचा गटनेता मला पक्षाचा व्हिप आला नाही. मात्र, पक्षाने कारवाईचा व्हिप दिला आहे.
- श्रीधर किंद्रे, माजी सभापती पंचायत समिती भोर