प्रसादामध्ये स्वच्छतेचे निकष पाळा,गिरीश बापट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:28 AM2017-09-15T03:28:36+5:302017-09-15T03:28:39+5:30

प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया प्रत्येक घटकाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. त्याचप्रमाणे तेथे स्वच्छतेचे निकष पाळले गेलेच पाहिजेत. सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी लोकांनीही सजग राहिले पाहिजे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केले.

 Keep the standards of cleanliness in Prasada, Girish Bapat | प्रसादामध्ये स्वच्छतेचे निकष पाळा,गिरीश बापट  

प्रसादामध्ये स्वच्छतेचे निकष पाळा,गिरीश बापट  

Next

पुणे : प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया प्रत्येक घटकाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. त्याचप्रमाणे तेथे स्वच्छतेचे निकष पाळले गेलेच पाहिजेत. सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी लोकांनीही सजग राहिले पाहिजे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केले.
धार्मिक स्थळी भाविकांना दिला जाणारा प्रसाद हा अधिक सुरक्षित असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागामार्फत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटप्रसंगी बापट बोलत होते. या वेळी उद्योजक आनंद चोरडिया उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘लोकांना अधिक सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.
या कार्यशाळेत विविध धार्मिक प्रसादालयातील विश्वस्त, आचारी, कर्मचारी तसेच परिसरातील हॉटेल खाद्यपदार्थ विक्रेते यांना सुरक्षित अन्न पदाथार्ची निर्मिती, साठवणूक व वाटप वितरण या बाबत प्रशिक्षित केले जात आहे.
कार्यशाळेस जैन श्वेतांबर, दादावाडी, मंदिर ट्रस्ट सारसबाग, श्री शंकरमहाराज समर्थ मठ धनकवडी, इस्कॉन मंदिर कात्रज, गुरुद्वारा श्री गुरुसिंग साहेब गणेश पेठ पुणे, गुरुनानक दरबार, कॅम्प, पुणे, श्री अक्कलकोट स्वामीमहाराज मठ, बुधवार पेठ, स्वामी नारायण मंदिर आंबेगाव या धार्मिक स्थळांचे विश्वस्त प्रसादालयाचे आचारी तसेच एसएनडीटी महाविद्यालयातील मुली, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग महाविद्यालयाच्या मुलांनी सहभाग घेतला होता.

अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी प्रास्तविकात पुणे विभागाच्या वतीने आजपर्यंत १५ धार्मिक स्थळांच्या प्रसादालयातील आचारी तसेच विश्वस्त यांच्या सह २०० हून अधिक लोकांना प्रशिक्षित केल्याचे सांगितले. एम.एम चितळे यांनी प्रशिक्षण दिले.
 

Web Title:  Keep the standards of cleanliness in Prasada, Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.