...प्रभाग रचना तेवढी चांगली ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:04+5:302021-09-26T04:11:04+5:30
महापालिका निवडणुकीचा प्रभाग कितीचा असावा, याविषयी सध्या चर्चा रंगली होती. दोन दिवसांपूर्वी ३ सदस्यांचा प्रभाग ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला. ...
महापालिका निवडणुकीचा प्रभाग कितीचा असावा, याविषयी सध्या चर्चा रंगली होती. दोन दिवसांपूर्वी ३ सदस्यांचा प्रभाग ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला. त्यावर सर्वत्र चर्चा रंगली. महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने प्रभाग ३ चा करण्यात आल्याचे बोलले जाऊ लागले. त्याचवेळी त्याचा फायदा पुन्हा भाजपला होणार असल्याचे सांगितले जाऊ लागले. स्थानिक पातळीवर व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही यावर चर्चा रंगल्या होत्या. काही ग्रुपमध्ये तर संभाव्य उमेदवार कोण असतील, याचा अंदाजही देणे सुरू झाले होते. पण, गोखलेनगरमधील एका ग्रुपवर वेगळीच चर्चा होती. त्यात प्रभाग कितीचा यापेक्षा त्याची रचना कशी असणार? यावरच सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून आले. सध्याचा हा प्रभाग एखाद्या पंख्याच्या पात्यासारखा आहे. तीन वेगळे भाग एकत्र करून त्याचा हा प्रभाग बनविला आहे. त्यामुळे निवडून आलेल्यांपैकी एकाचा अपवाद वगळता इतर नगरसेवकांची नावेही आता लोकांना आठवत नाही. त्याचवेळी इतक्या मोठ्या प्रभागात फिरून प्रचार करता येत नसल्याचा सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यामुळे प्रभागात सदस्य कितीही असू द्या. त्याच्या रचनेकडे पाहा. ती सुसंगत असावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.