पक्षभेद विसरून कार्यरत राहा

By admin | Published: March 28, 2017 02:59 AM2017-03-28T02:59:30+5:302017-03-28T02:59:30+5:30

निवडणूक लढवताना तुमच्यावर विविध पक्षांचे असल्याचा शिक्का होता; पण आता निवडून आल्यावर पक्षभेद न मानता

Keep working while forgetting the aliases | पक्षभेद विसरून कार्यरत राहा

पक्षभेद विसरून कार्यरत राहा

Next

वारजे : निवडणूक लढवताना तुमच्यावर विविध पक्षांचे असल्याचा शिक्का होता; पण आता निवडून आल्यावर पक्षभेद न मानता लोकहिताचे कार्य करा. यातच आपली व राष्ट्राची प्रगती असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक नाना खंडकर यांनी नूतन नगरसेवकांना दिला.
वारज्यातील मॉडर्न शाळेच्या वतीने नूतन लोकप्रतिनिधींच्या विजयाप्रीत्यर्थ सन्मान सोहळा आयोजित केला होता, त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुल वारजे आयोजित विजयोत्सव सन्मान सोहळा शुक्रवारी प्रशालेच्या सभागृहात आनंददायी वातावरणात झाला.
कार्यक्रमाला नाना खंडकर, अरविंद पांडे, ज्येष्ठ प्रचारक मोहन भागवत, शाळा समिती अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, मानसिंग साळुंके, समन्वयक शारदा हगवणे उपस्थित होते.
या वेळी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, दीपाली धुमाळ, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी, सायली वांजळे, स्वीकृत सदस्य दत्तात्रय चौधरी, जि. प. सदस्य अनिता इंगळे पॉप्युलरनगर फेडरेशनचे प्रल्हाद काटे, हेमंत घोलप, दत्तात्रय थोरात, नितीन पाटील, जयश्री बारंगळे यांना सन्मानित करण्यात आले. लोकांनी दिलेल्या प्रत्येक मताचा आदर असून, भरीव काम करून दाखवू, असा आशावाद सायली वांजळे यांनी बोलून दाखविला. (वार्ताहर)

Web Title: Keep working while forgetting the aliases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.