घरी राहून केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:24+5:302021-05-04T04:04:24+5:30
तिघांनाही कोरोना झाल्यामुळे आम्ही प्रचंड घाबरून गेलो होतो आणि मानसिक थोडा त्रास झाला होता. अशातच पुणे महापालिकेच्यावतीने कोंढवा येथील ...
तिघांनाही कोरोना झाल्यामुळे आम्ही प्रचंड घाबरून गेलो होतो आणि मानसिक थोडा त्रास झाला होता. अशातच पुणे महापालिकेच्यावतीने कोंढवा येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांनी धीर देत होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देत औषधोपचार सुरू केले.
इच्छाशक्तीच्या जोरावर पुणे मनपाचे डॉक्टर लाटणे यांच्या सल्ल्यानुसार औषधे घेत होतो. त्यांनी प्रथम आमच्या बीपी, शुगर तथा इतर तत्सम चाचण्या केल्या. त्या सर्वाँचा रिपोर्ट आल्यावर तुम्हाला काही त्रास नाही, फक्त विचार सकारात्मक ठेवा, असा सल्ला दिला. तसेच दिलेली काही औषधे वेळेवर घेण्यास सांगितले. आम्हीसुद्धा औषधे अगदी वेळेवर घेत होतो. आयुष्य मंत्रालयाने दिलेल्या आयुर्वेदिक काढा घेत होतो. याचबरोबर आम्ही योगासने, प्राणायम, सूर्यनमस्कार, मेडिटेशन रोज करत होतो. यामुळे आमच्यामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत होती.
दिवसभर गरम पाणी पिणे, भरपूर विश्रांती घेणे असे करत आम्ही ८ ते १० दिवसांत कोरोनावर संपूर्ण मात केली. यामध्ये आम्हाला डॉक्टर लाटणे, ब्राम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योग गुरू दीपक महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि बंधू राजेंद्र भिंताडे आणि मित्र परिवाराने भरपूर सहकार्य केले.