केसनंदमध्ये ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलला १३ जागा जिंकून निर्विवाद बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:19+5:302021-01-19T04:11:19+5:30

आज निकाल लागलेले विजयी उमेदवार : प्रभाग २ - सुजाता दशरथ हारगुडे प्रभाग ३ - सुनिता बाबासाहेब हारगुडे, सुनिता ...

In Kesanand, Om Bhagwati Shri Jogeshwari won the panel by 13 seats with an undisputed majority | केसनंदमध्ये ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलला १३ जागा जिंकून निर्विवाद बहुमत

केसनंदमध्ये ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलला १३ जागा जिंकून निर्विवाद बहुमत

Next

आज निकाल लागलेले विजयी उमेदवार : प्रभाग २ - सुजाता दशरथ हारगुडे प्रभाग ३ - सुनिता बाबासाहेब हारगुडे, सुनिता दिनेश झांबरे प्रभाग ५ - सचिन माणिक हारगुडे, विशाल बाजीराव हारगुडे, रोहिणी सचिन हारगुडे असे आहेत.

ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध ९ जागा झाल्या. सहा जागांसाठी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली.

औद्योगिक परिसर व वाढत्या रहिवासी वसाहतीसह एकूण ९,६२६ मतदारसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनेल प्रथम बिनविरोधमध्ये सात जागा हस्तगत केल्या, तर निवडणुकीत सहा जिंकल्या. या पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे व सहकारी करत आहे.

विरोधी भैरवनाथ पॅनलचे नेतृत्व माजी उपसरपंच पांडुरंग हारगुडे व सहकारी करत असून, त्यांना दोन जागा बिनविरोध मिळाल्या आहेत.

बिनविरोध उमेदवार: प्रभाग १ - धनंजय पोपट हारगुडे, प्रभाग २ - नितिन दत्तात्रय गावडे, अक्षदा सचिन हारगुडे,

प्रभाग ३ - प्रमोद चंद्रकांत हारगुडे,

प्रभाग ४ - दत्तात्रय मारुती हारगुडे, रेखा सुभाष बांगर, रुपाली गणेश हारगुडे, (सर्व ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनेल)

प्रभाग १ - भारत हारगुडे, ज्योती आंबादास हारगुडे (भैरवनाथ पॅनेल) असे आहेत.

गावच्या निवडणूक मतदार व जनता आमच्या बरोबर होती. सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना अशा विविध विकासकामांची पावती मिळाली. जनतेने एकहाती सत्ता दिली. गावच्या विश्वासाला पात्र राहून विविध विकासकामे राबवून गावाला प्रगती उत्कर्ष दिशेने निश्चित घेऊन जाऊ.

-मिलिंदनाना हारगुडे माजी सरपंच

केसनंद (ता.हवेली) ग्रामपंचायत निवडणूक विजय उमेदवाराचा कार्यकर्ते नी सत्कार करून आनंद व्यक्त केला.

Web Title: In Kesanand, Om Bhagwati Shri Jogeshwari won the panel by 13 seats with an undisputed majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.