पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी गणेशोत्सवाला सुरवात; टिळक पंचांगानुसार केसरीवाड्यात श्रींची प्राणप्रतिष्ठा

By श्रीकिशन काळे | Published: August 20, 2023 01:17 PM2023-08-20T13:17:58+5:302023-08-20T13:18:20+5:30

टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्येदेखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार

Kesari Ganeshotsav begins in Pune with the sound of drums According to Tilak Panchanga, Shri Pranapratistha in Kesariwada | पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी गणेशोत्सवाला सुरवात; टिळक पंचांगानुसार केसरीवाड्यात श्रींची प्राणप्रतिष्ठा

पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी गणेशोत्सवाला सुरवात; टिळक पंचांगानुसार केसरीवाड्यात श्रींची प्राणप्रतिष्ठा

googlenewsNext

पुणे : ढोल ताशाच्या गजरात आणि पालखीत मिरवणूक काढून टिळक पंचांगानुसार आज (दि. २०) पासून केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. शनिवार पेठेतील मूर्तिकार महेश गोखले यांच्याकडून प्रथेप्रमाणे सकाळी ९ वाजता ‘श्रीं’ची मूर्ती घेण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पालखीत गणराया विराजमान झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत बिडवे बंधूंचा सनई-चौघडा, श्रीराम व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचा समावेश होता.  

प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्‍वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक,पोलिस आयुक्‍त रितेश कुमार, उपायुक्त संदिपसिंग गिल, ‘केसरी’च्या विश्‍वस्त व्यवस्थापिका व केसरी गणेशोत्सव कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक, केसरी गणेशोत्सवाचे प्रमुख व विश्‍वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्‍वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, रौनक रोहित टिळक तसेच ‘केसरी’चे कर्मचारी व स्नेहीजन सहभागी झाले हाेते.

२० ते ३० ऑगस्ट दरम्यान हा गणेशोत्सव साजरा होत आहे. टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्येदेखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रथेप्रमाणे गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती केसरीवाड्यातील गणेश मंदिरातच ठेवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी) पासून पुन्हा गणेशोत्सवाला सुरुवात होईल. या गणेशोत्सवातही दर वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
टिळक पंचांगानुसार व्रत वैकल्ये करणार्‍यांच्या घरी आज गणरायाचे आगमन होते. अन्य पंचांगाप्रमाणे सध्या निज श्रावण महिना सुरू आहे, तर पुढील महिन्यात १९ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे.

रमणबाग चौक ते शिंदे पार चौक, ओंकारेश्‍वर मंदिरापासून वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलिस चौकीमार्गे मिरवणूकीने केळकर रस्त्यावरून टिळकवाड्यात प्रवेश केला. त्यानंतर, सकाळी १२.३० वाजता ‘केसरी’ गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी पोलिस आयुक्‍त रितेश कुमार यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती झाली.

Web Title: Kesari Ganeshotsav begins in Pune with the sound of drums According to Tilak Panchanga, Shri Pranapratistha in Kesariwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.