खेड गोळीबार प्रकरणात केशव अरगडे यांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:08+5:302021-08-28T04:16:08+5:30
पुणे: - शिवसेनेच्याच खेड पंचायत समिती सदस्या सुनीता संतोष सांडभोर यांच्यासह ११ सदस्यांनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण ...
पुणे: - शिवसेनेच्याच खेड पंचायत समिती सदस्या सुनीता संतोष सांडभोर यांच्यासह ११ सदस्यांनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे २४ मे रोजी समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याच्या रागातून अज्ञातस्थळी असलेल्या सदस्यांना गाठत गोळीबार केल्या प्रकरणात केशव अरगडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जखमींची प्रकृती चांगली आहे. तपास पूर्ण झाला असून, गुन्ह्यातील जप्ती झाली आहे. आता त्यांच्याकडून जप्त करण्यासारखे काहीही राहिले नसल्याचा निष्कर्ष काढत सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा आदेश दिला.
ही घटना खडकवासला परिसरातील एका हॉटेलमध्ये २७ मे रोजी पहाटे घडली. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात सभापती भगवान नारायण पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे यांच्यासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसाद काळे यांनी फिर्याद दिली आहे.