सरकारी वकील आरोपीच्या वकीलांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:35+5:302020-12-07T04:08:35+5:30

विवेक ठाकरे यांना स्वत:ला किंग बनायला होते. त्यामुळे यातील इतरांना बाजूला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी पुण्यातील सारसबागेत बैठक ...

Khadajangi among the lawyers of the accused | सरकारी वकील आरोपीच्या वकीलांमध्ये खडाजंगी

सरकारी वकील आरोपीच्या वकीलांमध्ये खडाजंगी

Next

विवेक ठाकरे यांना स्वत:ला किंग बनायला होते. त्यामुळे यातील इतरांना बाजूला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी पुण्यातील सारसबागेत बैठक घेतली. सोसायटी प्रास्तावित असताना त्यावर पैसे जमा केले. बाहेरच्यांच्या पावत्या केल्या. ३० ते ४० जणांच्या तक्रारी आहेत.

बचाव पक्षाच्या वतीने ॲड. उमेश रघुवंशी यांनी सांगितले की, आमचा व कंडारे यांचा काही संबंध नाही. पोलिसांनी आमच्या घरातून जप्त केलेली सर्व १२७ प्रकरणे मी स्वत: दिली आहेत. ज्या बैठका घेतल्या. त्यात कोण काेण उपस्थित होते, यांच्या सह्या घेतलेली कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व जणांची यादी आहे. ठेवीदारांच्या वतीने आपण काम पहात होतो. ठेवीदारांना प्रत्येक वेळी जळगाव येणे शक्य नसल्याने त्यांनी त्यांच्या मुळ ठेवपावत्या आपल्याकडे दिल्या होत्या. पोलिसांनी मागील पोलीस कोठडीच्या वेळी जी कारणे दिली आहेत, तीच कारणे यामध्ये पुन्हा दिली आहेत. ठेवीदारांना व्याजासह सर्व पैसे मिळावेत, अशीच आपली भूमिका आहे. ९ ठेवीदारांनी शपथपत्र दिली असून त्यात त्यांनी विवेक ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आमची कोणतीही फसवणूक झाली नसल्याचे सांगितले. पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे ही माहिती अधिकारात मिळविलेली आहेत. ठेवीदारांसाठी लढा उभारतोय आहे हा गुन्हा आहे का. सामाजिक संस्थेमार्फत पारदर्शक काम करतो असे त्यांनी सांगितले.

कमलाकर कोळीचा बचाव मांडताना ॲड. रघुवंशी यांनी सांगितले की, आपण चालक म्हणून कंडारे सांगतील, त्या ठिकाणी घेऊन जाणे हे काम होते. आपण ऑफिसर बेअरर नाही. फक्त चालक होतो. त्यामुळे त्यांनी कोणाबरोबर काय व्यवहार केले याच्याशी आपला काहीही संबंध नाही.

ठेवीदारांच्या वतीने अर्ज

ठेवीदारांच्या वतीने ॲड. मनोज नायकतफेर् ॲड, अक्षता नायक यांनी आज न्यायालयात एक अर्ज केला. त्यात ठेवीदारांच्या वतीने आपल्याला बाजू मांडण्यास संधी द्यावी अशी विनंती केली आहे.

Web Title: Khadajangi among the lawyers of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.