खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:00 AM2018-07-16T11:00:44+5:302018-07-16T15:34:25+5:30

दहा वाजता धरणातून ३ हजार ४३४ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे

khadakwasla dam is full due to heavy rainfall | खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

googlenewsNext

पुणे : खडकवासला धरण पूर्ण भरत असल्याने सोमवारी (16 जुलै) सकाळी ८ वाजता मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दहा वाजता धरणातून ३ हजार ४३४ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे.  

गेले काही दिवस पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने चारही धरणात मोठ्या प्रमाणावर जलसाठा होत आहे. रविवारी खडकवासला धरण ९१ टक्के भरले होते़. त्यानंतर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी ८ वाजता धरणाचे दोन दरवाजे एक-एक फुट उचलून नदीत सुरुवातीला १७१२ क्युसेस पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजता आणखी दोन दरवाजे एक-एक फुट उचलण्यात आले़ असून धरणातून नदीत आता ३ हजार ४३४ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. 

सध्या खडकवासला धरणसाखळीत १.७४२ टीएमसी पाणीसाठा असून तो ५.९७६ टक्के इतका झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १.१२४ टीएमसी (३.८५९ टक्के) पाणीसाठा होता. सकाळपर्यंत खडकवासला धरणात २७, पानशेत ९०, वरसगाव ८९, टेमघर १०७ मिमी पावसाची नोंद झाली होती. सध्या खडकवासला धरण १०० टक्के भरले असून पानशेत ७३ टक्के, वरसगाव ४६ टक्के, टेमघर ४६ टक्के भरले आहे. धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु राहिल्यास व धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्यास नदीत पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून ८ हजार क्युसेस पाणी सोडल्यास नांदेड गावाजवळील पुल पाण्याखाली जातो. तर २० हजार क्युसेस पाणी सोडल्यास डेक्कन जिमखान्यावरील भिडे पुल पाणी खाली जातो.

Web Title: khadakwasla dam is full due to heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.