Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : भीमराव तापकीर यांचा ५० हजारांच्या मताधिक्क्याने मोठा विजय, दोडके, वांजळे पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 05:43 PM2024-11-23T17:43:30+5:302024-11-23T17:45:56+5:30
Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : दिवंगत मनसे नेते रमेश वांजळे यांचे पुत्र मयूरेश वांजळे हे मनसेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र वडिलांप्रमाणे त्यांना खडकवासल्यात विजयी कामगिरी करता आली नाही.
Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर यांनी आपला दबदबा कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सचिन दोडके यांचा ५२,३२२ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. दिवंगत मनसे नेते रमेश वांजळे यांचे पुत्र मयूरेश वांजळे हे मनसेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र वडिलांप्रमाणे त्यांना खडकवासल्यात विजयी कामगिरी करता आली नाही.
२५ फेऱ्यांतील मतमोजणीनंतर अंतिम मते
- भीमराव तापकीर (भाजप): १,६३,१३१ मते
- सचिन दोडके (राष्ट्रवादी - शरद पवार गट): १,१०,८०९ मते
- मयूरेश वांजळे (मनसे): ४२,८९७ मते
मतमोजणीच्या पसुरुवातीपासून भीमराव तापकीर यांनी चांगली सुरुवात केली. मत मोजणीच्या फेऱ्यांसह तापकीर यांची आघाडी वाढत गेल्याने अखेर विरोधकांना पराभव स्वीकारावा लागला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे जोरदार प्रचार करण्यात आला होता, मनसेच्या मयुरेश वांजळे यांनी देखील मतदारांना सद् घातली होती. मात्र, भाजप पक्ष संघटनेची ताकद आणि तापकीर यांच्या स्थानिक प्रभावामुळे अखेर विजय त्यांच्याच पारड्यात पडला.